‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेले विनोदवीर म्हणजे अरुण कदम. आपल्या विनोदाने अरुण कदम संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवतात. अरुण कदम आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वीच लेकीने गोंडस बाळाला जन्म दिला. अरुण कदम आपला नातू अथांगचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात.
हेही वाचा- ‘बिग बॉस मराठी’ विजेता अक्षय केळकरला लागलं म्हाडाचं घर; राखी सावंतने दिला सल्ला, म्हणाली, “आता…”
अरुण कदम यांनी नातवाबरोबरचा एक गोड व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अरुण कदम त्यांच्या नातवाला अंगाई गीत गाताना दिसत आहेत. ‘विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला’ हा अभंग म्हणत अरुण कदम नातवाला झोपवताना दिसत आहेत. अंगाई म्हणत म्हणत अरुण कदम यांनी तालही धरला आहे. तर अरुण कदम यांचा नातू मन लावून त्यांचा अभंग ऐकताना दिसत आहे.
अरुण कदम यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत. एकाने कमेंट करत लिहिलं “ले बेबी— बाबा मस्त वाटतोय हाताचा पाळणा… आता मी झोपणारच नाय”, तर दुसऱ्याने ‘खूप मौल्यवान क्षण’ अशी कमेंट केली आहे.
हेही वाचा- शशांक केतकरला ‘या’ बॉलीवूड अभिनेत्रींना घेऊन जायला आवडेल डेटवर; अभिनेता म्हणाला, “मला…”
काही दिवसांपूर्वीच अरुण कदम यांनी अथांगचा एक व्हिडीओ शेअर केला होता. सुकन्या त्याच्यासाठी गाणं गाताना दिसत होती. या गाण्याला अथांक त्याच्या अंदाजात प्रतिक्रिया देत होता. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी ‘बॉक्सर भाई आ गया है’ असं कॅप्शनही दिलं होतं.