scorecardresearch

Premium

‘बिग बॉस मराठी’ विजेता अक्षय केळकरला लागलं म्हाडाचं घर; राखी सावंतने दिला सल्ला, म्हणाली, “आता…”

बॉलीवूडची ड्रामा क्वीन राखी सावंतने अक्षय केळकरला काय सल्ला दिला? जाणून घ्या…

Bollywood drama queen Rakhi Sawant gave advice to Akshay Kelkar
बॉलीवूडची ड्रामा क्वीन राखी सावंतने अक्षय केळकरला काय सल्ला दिला? जाणून घ्या…

‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा विजेता अक्षय केळकर नेहमी चर्चेत असतो. कधी वैयक्तिक आयुष्यामुळे तर कधी व्यावसायिक आयुष्यामुळे तो चर्चेत असतो. अशा या चर्चेत असणाऱ्या अक्षयला मुंबईत म्हाडाचं घर लागलं असून काल त्यानं स्वतःच्या हक्काच्या घराचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली.

अभिनेता अक्षय केळकरने यावर्षी म्हाडाच्या मुंबईच्या प्रकल्पासाठी अर्ज केला होता. या सोडतीमध्ये तो विजेता ठरला आणि त्याला हक्काच घर मिळालं. “माझं पहिलं घर ते ही मुंबईत” अशी पोस्ट लिहित काल अक्षयने नव्या घराचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. तेव्हापासून अक्षयवर कलाकार मंडळींसह चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहे. अभिनेत्री समृद्धी केळकर, प्रथमेश परब, योगिता चव्हाण, अक्षया नाईक, सोनाली पाटील, ऋतुजा बागवे, अश्विनी कासार, शर्मिला शिंदे, सुकन्या मोने अशा अनेक कलाकारांनी अक्षयला शुभेच्छा दिल्या आहेत.

kitchen jugaad stick bindi paper on gas cylinder
Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
maratha community marathi news, economically backward marathi news
मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या मागास म्हणता येणार नाही- उच्च न्यायालय
Eknath shinde devendra fadnavis 2
“शिवसेना भाजपाच्या दावणीला बांधलेली नाही”, लोकसभेच्या ‘त्या’ फॉर्म्युलावर शिंदे गट आक्रमक; म्हणाले, “आमच्याबरोबर दगाफटका…”
rohit pawar, baramati, lok sabha, supriya sule, sunetra pawar, ajit pawar, sharad pawar, maharashtra politics,
बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार नव्हे, ‘यांच्या’त होणार लढत, रोहित पवार यांचे मोठे विधान

हेही वाचा – शशांक केतकरला ‘या’ बॉलीवूड अभिनेत्रींना घेऊन जायला आवडेल डेटवर; अभिनेता म्हणाला, “मला…”

पण बॉलीवूडची ड्रामा क्वीन राखी सावंतने अक्षयला शुभेच्छा देण्याऐवजी सल्ला दिला आहे. अक्षय केळकरचं नवं घर पाहून राखी सावंत म्हणाली की, आता लवकर लग्न कर भाई. राखीच्या या सल्ल्यावर अद्याप अक्षयने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

हेही वाचा – टीआरपीच्या शर्यतीत वरचढ ठरली ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ आलेली कला; जुन्या मालिकांना मागे टाकतं मारली बाजी

दरम्यान, अक्षय विजेता ठरलेल्या ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात राखी सावंत झळकली होती. त्यामुळे अक्षय आणि राखीची चांगली मैत्री आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bollywood drama queen rakhi sawant gave advice to akshay kelkar pps

First published on: 01-12-2023 at 14:51 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×