Zee Natya Gaurav Puraskar 2025 : मराठी नाट्यविश्वात मानाचा समजला जाणारा ‘झी नाट्य गौरव’ पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला यंदा ‘ज्याची त्याची लव्हस्टोरी’, ‘असेन मी नसेन मी’, ‘शिकायला गेलो एक’, ‘वरवरचे वधूवर’, ‘विषामृत’ अशा बऱ्याच नाटकांमध्ये चुरस रंगली होती. अखेरीस सोहळा पार पडल्यावर आता विजेत्या कलाकारांची नावं हळुहळू समोर येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत दुर्गाची भूमिका साकारणारी जहागीरदारांची मोठी सून ‘ज्याची त्याची लव्हस्टोरी’ या नाटकात ‘आरती’ ही विनोदी व्यक्तिरेखा साकारत आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे शर्मिला शिंदे. शर्मिलाला ‘झी नाट्य गौरव पुरस्कार’ सोहळ्यात यंदाच्या ‘सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री’चा अवॉर्ड मिळाला आहे. यानिमित्ताने सविस्तर पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने सर्वांचे आभार मानले आहेत.

शर्मिला शिंदेची पोस्ट

“तू करू शकतेस, तुझ्यात ती ताकद आहे” असं मला चंद्रकांत लोकरे दादाने नाटकाच्या प्रोसेस मध्ये एकदा खास बसवून सांगितलं होतं. काही लोकांच्या Success स्टोरीजची उदाहरणं जोडत मला पक्क Motivate केलं होतं. आता चंदू दादाने आपल्यावर दाखवलेला विश्वास चुकीचा ठरू द्यायचा नाही आणि चंदू दादाला हरू द्यायचं नाही असं ठरवलं आणि तिथेच ‘आरती’ हे पात्र साकारण्याचा माझा Base तयार झाला.

प्रियदर्शन जाधवबरोबर काम करायची इच्छा माझ्या मनात काही वर्षांपासून होती. तशी ती मेसेजद्वारे मी एकदा व्यक्त सुद्धा केली होती. अखेर ‘ज्याची त्याची लव्ह स्टोरी’च्या निमित्ताने ती पूर्ण झाली. दर्शनकडून खूप काही शिकायला मिळालं. तो सांगेल तसं परफॉर्म करण्याचा प्रयत्न करत राहिले. “लेखकाशी एवढ्या गप्पा कुठला आर्टिस्ट कधी मारत नाही” असं मला एकदा आमचा लेखक ऋषिकांत राऊत म्हणाला होता. पण, ‘आरती’सारखं पात्र लिहिणाऱ्या लेखकाशी तर मला अजून खूप बोलायचं आहे. मी खूप लकी आहे की, ते साकारण्याची संधी मला मिळाली. तुझ्या पहिल्याच व्यावसायिक नाटकाला सर्वोत्कृष्ट नाटकाचा पुरस्कार मिळाला. तुझ अभिनंदन.

मृणाल देशपांडेने डिझाइन केलेल्या लूकमुळे आरती मध्ये शिरणं एकदम सोपं होऊन जातं. It Speaks Before I Speak. मयुरेश केळुस्कर दर्शनची असिस्टेंट डायरेक्टर म्हणून तू जशी साथ दिली आहेस तशीच साथ, मदत तुझी मला पण झाली. Thank you for everything. आकाश, नितिन, निलेश, आदू तुम्ही दिलेला टेक्निकल सपोर्ट हा खूप महत्वाचा आहे. त्यासाठी तुमचे मनापासून आभार.

पूर्णानंद वांधेकर… पूर्णा तुझ्याशिवाय आरती पूर्ण झालीच नसती. तू आरतीचा खरा Better Half आहेस. तिचा Half होऊन तिला तू Complete केलं आहेस. माझी on stage इतकी fantastic साथ दिल्याबद्दल तुझी खूप खूप आभारी आहे मी. Couldn’t have asked for a better Prakash Patil आपण खरे हॅशटॅग आकाश झालो तुझ्यामुळे. तीन मुली एकत्र एका मेकअप रूममध्ये, एका प्रोजेक्ट मध्ये न भांडता इतक्या प्रेमाने राहू शकत नाही असं म्हणणाऱ्या लोकांच्या नाकावर टिचून मी, सुरुची अडारकर आणि शर्वरी कुलकर्णी या नाटकात मजा करतो. You are my power puff girls. I love you

दरम्यान, सध्या संपूर्ण मनोरंजन विश्वातून शर्मिलावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. ‘ज्याची त्याची लव्हस्टोरी’ या त्यांच्या नाटकाला एकूण ५ पुरस्कार मिळाले आहेत. हे नाटक यंदाचं ‘सर्वोत्कृष्ट नाटक’ देखील ठरलं आहे. ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’, ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’, ‘सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री’, ‘सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री’ असे पाच पुरस्कार या नाटकाला मिळाले आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navri mile hitlerla fame actress received best comedy actress award in zee natya gaurav sva 00