‘पुन्हा कर्तव्य आहे’ (Punha Kartvya Aahe) ही मालिका काही दिवसांपासून प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस उतरताना दिसत आहे. वसुंधराने तिचा पहिला नवरा शार्दुल जिवंत असल्याचे सत्य आकाश व त्याच्या कुटुंबाला सांगितले नव्हते. मात्र, अचानक शार्दुल लकी हे नाव बदलून तिच्या आयुष्यात आला. वसुंधराशी वाईट वागणाऱ्या आणि स्वत:च्या आई-वडिलांना अतोनात छळणाऱ्या शार्दुलने वसुंधराच्या सासरच्या कुटुंबीयांची मने जिंकून घेतली. आकाशची आई त्याला तिचा चौथा मुलगा मानते. काही दिवसांपूर्वी लकी ऊर्फ शार्दुल हाच वसुंधराचा पहिला पती असून, तो जिवंत असल्याचे आकाश व तिच्या कुटुंबाला समजते. त्यानंतर सर्व जण वसुंधराचा द्वेष करतात. आकाशलादेखील वसुंधराबाबत गैरसमज निर्माण होतो. आता ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आकाश वसुंधराच्या बाजूने ठामपणे उभा राहणार…

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर केला आहे. बनीला वाचवण्यासाठी गेल्यानंतर आकाशला गोळी लागली होती. आकाश आता बरा झाला असून, वसुंधरा व त्याच्यातील गैरसमजदेखील दूर झाले आहेत. मात्र, या संदर्भात पोलिस आता तपास करत आहेत. न्यायालयात या खटल्यासंदर्भात सुनावणी चालू असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. वकील म्हणतो, “वसुंधरा ठाकूर यांनी आकाश ठाकूरांवर हल्ला घडवून आणला.” साक्ष देण्यासाठी आलेली व्यक्ती म्हणते की, या मॅडमनी सुपारी दिली म्हणून मी हल्ला केला. शार्दुल म्हणतो, “हिला ना आयुष्यभर फक्त पैशात लोळायचं होतं.” आकाशची आई म्हणते, “हिने माझ्या लेकाला फसवून लग्न केलंय.” वसुंधराला तिच्यावर होत असणारे आरोप सहन होत नसल्याचे दिसत आहे. ती, “सगळं खोटंय, खोटं बोलत आहेत सगळे,” असे म्हणत चक्कर येऊन जमिनीवर पडते. आकाश तिला सावरण्यासाठी पुढे येतो. तो वसुंधराची बाजू न्यायालयासमोर मांडताना म्हणतो, “हा सगळा कट माझ्या आईने म्हणजेच जयश्री ठाकूर यांनी रचला आहे.”

इन्स्टाग्राम

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “बायकोची बाजू मांडताना आकाश आईच्या विरोधात जाणार…!”, अशी कॅप्शन दिली आहे.

पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेचा प्रोमो पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला आहे. एका नेटकऱ्याने कमेंटमध्ये लिहिले, “आकाश सर खूप चांगलं केलं.” दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “अरे, त्या विशाखा आणि तनयाला समोर आणा आणि ‘धुऊन’ टाका.” आणखी एका नेटकऱ्याने म्हटले, “आकाश, तुझा अभिमान आहे. कायम खऱ्याच्या बाजूने उभा राहतोस.” एका नेटकऱ्याने लिहिले, “आकाश वसुंधराला पाठिंबा देतो हे बघताना छान वाटते.”

हेही वाचा: Video : साऊथ इंडस्ट्री गाजवणारी मृणाल ठाकूर जेव्हा अहिराणी भाषेत बोलते…; नेटकरी म्हणाले, “आम्हाले अभिमान शे…”

आता आकाशला मारण्याचा नक्की प्लॅन कोणाचा होता, हे समोर येणार का, आकाश प्रमाणेच त्याच्या कुटुंबातील सर्वांचा वसुंधराबद्दल गैरसमज दूर होणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Punha kartvya aahe serial akash will stand firm on vasundhars side will go against the mother netizens praised says proud of you nsp