‘कोकण हार्टेड गर्ल’ अर्थात अंकिता वालावलकर सध्या वैवाहिक जीवन एन्जॉय करताना दिसत आहे. १६ फेब्रुवारीला अंकिताचा मोठ्या थाटामाटात लग्नसोहळा पार पडला. संगीतकार कुणाल भगतशी अंकिताने लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या वाटेवर पाऊल ठेवलं. अंकिता आणि कुणालच्या लग्नाला प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरसह कलाकार आणि राजकारणातील मंडळींनी खास उपस्थिती लावली होती. पण, मनसे अध्यक्ष राज ठाकरे गैरहजर होते. त्यामुळे राज ठाकरे यांनी अंकिताच्या वडिलांना पत्र लिहून दिलगिरी व्यक्त केली होती आणि लग्नाला उपस्थित न राहण्यामागचं कारण सांगितलं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंकिता वालावलकरने लग्नाची सर्वात आधी बातमी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना सांगितली होती. तसंच त्यानंतर लग्नाची पत्रिका देण्यासाठी अंकिता कुणालसह राज ठाकरेंच्या निवासस्थानी गेली होती. याचा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला होता. नुकताच अंकिताने इन्स्टाग्राम स्टोरीवर राज ठाकरेंच्या पत्राचा फोटो शेअर केला आहे. या पत्राद्वारे राज ठाकरेंनी अंकिताला लग्नाच्या शुभेच्छा देत दिलगिरी व्यक्त केली आहे.

राज ठाकरेंनी अंकिताचे वडील प्रमोद वालावलकर यांना पत्र लिहिलं होतं. या पत्रात त्यांनी लिहिलेलं की, आपली कन्या चि. सौ. कां अंकिता हिच्या शुभ विवाहाचे आपण अगत्यपूर्वक पाठविलेलं निमंत्रण मिळालं, त्याबद्दल धन्यवाद. सदर मंगल सोहळ्यास उपस्थित राहण्यास निश्चित आनंद वाटला असता. परंतु पूर्वनियोजित दौऱ्यामुळे उपस्थित राहता येत नसल्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो. आम्हा उभयतांकडून नव दांपत्यास शुभेच्छा. तसेच पुढील वैवाहिक आयुष्य सुखः समृद्धी व भरभराटीचे जावो ही आई जगदंबे चरणी प्रार्थना. आपला नम्र, राज ठाकरे.

राज ठाकरेंनी हे पत्र अंकिताच्या लग्नाआधी ११ फेब्रुवारीला लिहिलं होतं. या पत्राचा फोटो अंकिताने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत “मराठी भाषा गौरव दिन आणि आलेलं पत्र”, असं लिहिलं आहे. तसंच कुणालदेखील राज ठाकरेंचं पत्र इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलं आहे.

अंकिता वालावलकर इन्स्टाग्राम स्टोरी

दरम्यान, एका व्हिडीओमध्ये अंकिता म्हणाली होती की, तुम्ही सर्वांनी ‘बिग बॉस’च्या घरातील माझा प्रवास पाहिला. मी खूप जास्त भावनिक मुलगी आहे. जेव्हा आमचं लग्न ठरत होतं. तेव्हाची एक गोष्ट तुम्हाला सांगते. आमच्या दोघांचे बरेच गुण जुळतात, त्यापैकीचं एक गुण जुळला तो म्हणजे आमच्या भावना. त्या भावनांपैकी एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजे माननीय राज ठाकरे. जेव्हा ‘येक नंबर’ या चित्रपटाचं काम चालू होतं आणि कुणाल या चित्रपटासाठी काम करत होता. तेव्हा मला खूपच आनंद झाला होता. यादरम्यानच आम्ही राज ठाकरेंना सगळ्यात आधी आमच्या लग्नाची बातमी सांगितली होती. राज साहेबांना आम्ही गुढीपाडव्यालाच लग्नाबद्दल सांगितलं होतं. पण, त्यानंतर ‘बिग बॉस’मुळे सगळ्या गोष्टी पुढे ढकलल्या गेल्या.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray not attend ankita walawalkar wedding for these reason pps