संकर्षण कऱ्हा़डे हा मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. अभिनयाच्या जोरावर संकर्षणने कलाविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. मालिकांमध्ये काम करुन त्याने अभिनयाचा ठसा उमटवला. उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या संकर्षणचा चाहता वर्गही मोठा आहे.
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
संकर्षण सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. आगामी प्रोजेक्ट्सबरोरच अनेकदा तो कुटुंबियांबरोबरचे फोटोही शेअर करताना दिसतो. सध्या संकर्षणने केलेल्या एका पोस्टची चर्चा रंगली आहे. संकर्षणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन जेवणाच्या ताटाचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत दररोज सकाळी ८:३० वाजता जेवत असल्याचा खुलासा संकर्षणने केला आहे.
मी तुम्हाला आज एक गंमत सांगतो…मी वयाच्या ७ व्या वर्षी पासून आजपर्यंत रोज सकाळी ८ः३० वा. जेवतो.. पोट्टभर..माझे बाबा बॅंकेत होते. आता रिटायर्ड झाले. ते बरोबर ८.४०ला घरातून निघायचे..कधीच त्यांची वेळ चुकली नाही आणि ८.३०ला पान वाढायची माझ्या आईची वेळ कधी चुकली नाही.
आजही शूट असेल, नसेल…सकाळी लवकर जायचं असेल नसेल…मला सकाळी ८.३० वाजले की पोटभर भूक लागते…आणि मी पोटभर जेवतोच… आज आईने साधं वरण भात, हिरव्या टोमॅटोची भरलेली भाजी, वांग्याचं भरीत वाढलं. अहो, काय सांगू कसं वाटलं…मनसोक्तं हानलं बघा…माझ्या आईच्या हातचं काहीही अप्रतिमच लागतं..सहज शेअर करावं वाटलं
संकर्षणने ‘आभास हा’, ‘मला सासू हवी’, ‘देवा शप्पथ’, ‘खुलता कळी खुलेना’, ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकांमधून अभिनायची छाप पाडली. मालिकांबरोबरच त्याने चित्रपटांमध्येही काम केलं आहे. सध्या तो ‘आम्ही सारे खवय्ये’ या शोचं सूत्रसंचालन करत आहे.