मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे सायली संजीव. चित्रपट, मालिका या दोन्ही माध्यमात काम करून आपल्या अभिनयचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या सायली संजीवचा सोशल मीडियावर प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. नुकतीच सायलीने सुबोध भावेच्या ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. ज्यात एका प्रश्नाचं उत्तर देताना सायलीने कॉलेजमधील प्रेमाबद्दल खुलासा केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : करणवीर बोहराने पूनम पांडेशी केलेल्या ‘त्या’ कृतीमुळे नेटकरी नाराज; म्हणाले, “घरी गेल्यावर बायको…”

सुबोध भावे सुत्रसंचलन करत असलेला ‘बस बाई बस’ हा कार्यक्रम सध्या बराच गाजतोय. आतापर्यंत सुप्रिया सुळेंपासून सोनाली कुलकर्णीपर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांनी या कार्यक्रमात हजेरी लावली आहे. सध्या सायली संजीव स्पेशल एपिसोडचे प्रोमो सोशल मीडियावर गाजताना दिसत आहे. या कार्यक्रमात एका सेगमेंटमध्ये सायलीला प्रपोज करण्याबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी तिने कॉलेजमधील एक गमतीशीर किस्सा सांगितला.

सायली म्हणाली, “मी बऱ्यापैकी स्पष्टवक्ती आहे. माझ्या जे मनात असेल ते मी बोलून मोकळी होते आणि आपल्याला जर एखादा मुलगा आवडत असेल तर आपण त्याला प्रपोज करावं. पण कॉलेजमध्ये असताना मी ज्या मुलांना प्रपोज केलं, त्यापैकी एकाही मुलाने मला होकार दिला नाही.” सायलीच्या या उत्तराने तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनाच फार आश्चर्य वाटलं. पुढे सायली म्हणाली, “आज हा एपिसोड ते बघत असतील. त्यांना हा प्रसंग बरोबर आठवेल.” त्या मुलांनी सायलीला का होकार दिला नाही, असा प्रश्न सगळ्यांना पडला.

हेही वाचा : ‘गोष्ट एका पैठणीची’ला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार मिळाल्यानंतर सायली संजीव भावूक, म्हणाली “बाबांची इच्छा होती की…”

सायलीने दिलेल्या या उत्तरावर सुबोध भावे आणि शरद केळकर यांनी त्या मुलांनी काय कारणं दिली असतील याचा अंदाज लावत सायलीची मस्करीही केली. सुबोध म्हणाला, “त्यांनी काय उत्तर दिलं? थोडी मोठी हो आणि ये, असं ?” त्यावर शरद म्हणाला, “पण तू कॉलेजमध्ये गेलीस का? की अजूनही शाळेतच आहेस?” पण या सगळ्यामध्ये सायलीने सांगितलेल्या किस्स्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sayali sanjeev shared memory of college days rnv