‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेमुळे अभिनेत्री अक्षया नाईक घराघरांत लोकप्रिय झाली. नुकताच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. २०२० मध्ये ही मालिका कलर्स मराठी वाहिनीवर सुरु झाली होती आणि १४ ऑगस्ट २०२३ रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला. या मालिकेमुळे अनेक नवोदित कलाकार प्रसिद्धीझोतात आले. अक्षया नाईकने मालिकेत ‘लतिका’ ही भूमिका साकारली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “चुकणारी, हसणारी, रडणारी अन्…”, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील भूमिकेबद्दल तेजश्री प्रधानने केला खुलासा

अभिनेत्री अक्षया नाईकला सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेमुळे एक वेगळी ओळख मिळाल्यामुळे तिने भावुक होत खास पोस्ट शेअर केली आहे. अक्षया म्हणाली, “ती खूप ‘सुंदर’ आहे, हे मान्य करण्यासाठी जी मुलगी संघर्ष आणि धडपड करत होती. ती मुलगी आज ‘सुंदरा’ म्हणून ओळखली जाते. लतिकावर माझ्या कायम जवळची असेल. लतिकाला खूप प्रेम दिल्याबद्दल प्रेक्षकांचे खूप खूप आभार.”

हेही वाचा : आजारी बायकोसाठी उमेश कामतने बनवला शिरा; प्रिया बापट चवीबद्दल म्हणाली…

अक्षयाने या पोस्टसह एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेचा पहिला भाग प्रदर्शित झाल्यावर तिने कुटुंबासह कशाप्रकारे आनंद साजरा केला होता याची छोटीशी झलक या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री पुढे म्हणते, “आता रस्त्याने जाताना आता सगळे लोक, लहान मुलं, आजी-आजोबा अगदी सगळेच मला ‘सुंदरा’ या नावाने हाक मारतात. हे ऐकून खरंच खूप छान वाटतं.”

हेही वाचा : “मला जराही भीती…”, ‘जवान’मधील व्हायरल डायलॉगनंतर समीर वानखेडेंनी शाहरुख खानला दिलं चोख प्रत्युत्तर?

दरम्यान, ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेमध्ये अक्षया नाईकसह समीर परांजपे, प्रणव प्रभाकर, पूजा पुरंदरे, ऋषिकेश शेलार, कुणाल धुमाळ, गौरी किरण या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sundara manamadhe bharli fame akshaya naik shared emotional post for serial sva 00