बॉलीवूड अभिनेता तुषार कपूर याने काही महिन्यांपूर्वीच गर्भाशय भाडय़ाने घेऊन (सरोगसी) तंत्रज्ञानाद्वारे एका मुलाचं पितृत्व स्वीकारलं होतं. त्याने लग्न नकरता एकल पालकत्व स्विकारण्याचा निर्णय घेतलेला. सरोगसी आणि आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा वापर करून तुषार बाबा झाला. त्याने आपल्या बाळाचे नाव लक्ष्य ठेवले असून ही गोड बातमी प्रथम त्याची बहिण एकता कपूर हिने दिली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, तुषारने त्याच्या बाळाचा आणि आजोबांचा म्हणजेच अभिनेता जितेंद्र कपूर यांचा एक सुंदर फोटो ट्विट केला आहे. या फोटोत तान्हुला लक्ष्य त्याचे आजोबा म्हणजेच अभिनेता जितेंद्र यांच्यासोबत दिसतो. आजोबा-नातू एकमेकांकडे यात पाहताना दिसतात. या फोटोला तुषारने कॅप्शनही दिले आहे. त्यात तुषारने म्हटले की, ‘काय बघतोयसं? पोजमधील फोटो.. यात विशेष असे काही नाही.. बाप नंबरी बेटा दस नंबरी.. ‘ तसेच त्याने या कॅप्शनला #love #family हे टॅगही दिले आहेत.

सरोगसीद्वारे पिता होण्याची इच्छा असणाऱ्या तुषारच्या मुलाचा जन्म मुंबईमधील जसलोक रुग्णालयात डॉ. फिरोजा पारिख यांच्या देखरेखीखाली झाला होता. सेलिब्रिटी असलेल्या तुषारचा हा धाडसी निर्णय असल्याची भावना डॉ. फिरोजा पारिख यांनी त्यावेळी व्यक्त केली होती. तुषार सतत मुलाची काळजी घेत असून, पिता झाल्याने तो अत्यंत आनंदित असल्याचे डॉ. फिरोजा म्हणाल्या होत्या. नातवाला पाहून आजोबा जितेंद्रदेखील खूप खूश झालेले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tusshar kapoor shared his son laksshyas photo with father