‘ला कासा दे पपेल’ (La Casa De Papel) या स्पॅनिश वेब सीरिजची इंग्रजी आवृत्ती ‘मनी हाईस्ट’ (Money Heist) चांगलीच चर्चेत आहे. जगभरात लोकप्रिय झालेल्या या वेब सीरिजचा चौथा सिझन एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. या सीरिजमधल्या कलाकार हे त्यांनी साकारलेल्या भूमिकांमुळे आज जगभरामध्ये लोकप्रिय झाले आहेत. या व्यक्तीरेखांपैकी एक म्हणजे नैरोबी. सर्वांची काळजी घेणारी, सर्वांना समजून घेणारी नैरोबी पडद्यावर साकारणारी अल्बा फ्लोरेसचा मोठा चहतावर्ग निर्माण झाला आहे. चौथ्या पर्वामध्ये नैरोबीचा मृत्यू झाल्याचे दाखवण्यात आलं आहे. त्यामुळेच चौथे पर्व प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांनी इंटरनेटवरुन ही भूमिका साकारणाऱ्या अल्बाचे कौतुक केल्याचं पहायला मिळालं. मात्र आता अल्बाने याआधी चक्क एका भारतीय महिलेची साकारल्याची माहिती समोर आली आहे. या चित्रपटातील काही व्हिडिओ आणि फोटो आता व्हायरल झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘व्हाइसेंटे फेरेर’ या स्पॅनिश चित्रपटामध्ये अल्बाने आंध्रप्रदेशमधील एका ग्रामीण भागातील महिलेची भूमिका साकारली होती. या चित्रपटामध्ये अल्बाने साकारलेल्या भूमिकेचे नाव शामिरा असं होतं. यामध्ये अल्बा अगदी एखाद्या दाक्षिणात्य कलाकाराप्रमाणे व्यवस्थित तेलगू संवाद बोलताना दिसत आहे. समाजकार्य करण्यासाठी एक स्पॅनिश व्यक्ती भारतामधील आंध्र प्रदेशमध्ये येतो आणि तेथील लोकांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न करतो अशी या चित्रपटाची कथा आहे.

२०१३ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. याच चित्रपटातील अल्बाने साकारलेल्या भूमिकेचे काही व्हिडिओ सध्या व्हायरल झाले आहेत. ग्रामीण भागातील महिला म्हणून अल्बा साडीमध्ये दिसते, अस्सल ग्रामीण तेलगू भाषेत बोलताना दिसते. हा व्हिडिओ पाहून अनेक भारतीयांना आश्चर्याचा सुखद धक्काच बसला आहे.

या चित्रपटाची संपूर्ण कथा ही अंतापुरम या आंध्र प्रदेशमधील गावामध्ये घडते. या गावात राहणारी शामिरा त्यांच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी आलेल्या व्यक्तीच्या मदतीने आपण प्रयत्न केले पाहिजेत या मताची असते. त्यासाठी मग ती गावातील महिलांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करते. या चित्रपटामध्ये अल्बा अगदी साडी नेसण्याबरोबर टीकली लावून अगदी भारतीय महिलेप्रमाणे वावरलेली दिसत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch money heists nairobi alba flores speaks fluent telugu as shamira from andhra pradesh scsg