मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांची ठाकरे सरकारने बदली केली आहे. त्यांना आता नगरविकास खात्याचे सचिवपद देण्यात आले आहे. ठाकरे सरकारच्या या निर्णयावरुन भाजापने मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी ट्विट करुन ठाकरे सरकारने घेतलेल्या निर्णयावर टीका केली आहे. आपली जबाबदारी झटकण्यासाठी आयुक्तांची बदली करणे हा मार्ग नाही. अधिकाऱ्यांची अदलाबदल करण्याऐवजी उपाय योजना सशक्त आणि गतिमान करण्याची आवश्यकता आहे असं ट्विट करत दरेकर यांनी ठाकरे सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांची बदली करण्यात आली आहे. आता मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून UDD चे प्रधान सचिव असलेले इकबाल चहल हे काम पाहतील. तर ठाणे महापालिकेचे माजी आयुक्त संजीव जैस्वाल यांची मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. प्रवीण परदेशी यांना नगरविकास खात्याचे सचिवपद देण्यात आले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp criticized thackeray government on praveen pardeshis transfer scj