"सोनं नाही भंगार..." उद्धव ठाकरेंच्या भाषणावर भाजपाच्या प्रसाद लाड यांची टीका, म्हणाले "अमित शाहांवर टीका करण्याइतकी उंची नाही" | BJP Prasad Lad on Shivsena Uddhav Thackeray Dasara Melava Shivaji Park Amit Shah sgy 87 | Loksatta

“सोनं नाही भंगार…” उद्धव ठाकरेंच्या भाषणावर भाजपाच्या प्रसाद लाड यांची टीका, म्हणाले “अमित शाहांवर टीका करण्याइतकी उंची नाही”

बाळासाहेबांच्या भाषेत बोलायला गेलं तर फार बोगस भाषण होतं, प्रसाद लाड यांची टीका

“सोनं नाही भंगार…” उद्धव ठाकरेंच्या भाषणावर भाजपाच्या प्रसाद लाड यांची टीका, म्हणाले “अमित शाहांवर टीका करण्याइतकी उंची नाही”
बाळासाहेबांच्या भाषेत बोलायला गेलं तर फार बोगस भाषण होतं, प्रसाद लाड यांची टीका

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्यानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. महाविकास आघाडीकडून एकनाथ शिंदेवर टीका होत असून, भाजपा नेते उद्धव ठाकरेंना लक्ष्य करत आहेत. भाजपा नेते प्रसाद लाड यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली असून ‘सोनं नाही तर भंगार लुटलं’ असा टोला ‘एबीपी माझा’शी लगावला आहे.

“टोमण्यांच्या पलीकडे या भाषणात काहीच नव्हतं. मी टोमणे मारतोय का हे त्यांना वारंवार विचारावं लागत होतं. जो टोमणे मारतो त्याला विचारावं लागत नाही. या भाषणात टोमणे आणि अहंकाराच्या पलीकडे काही नव्हतं. बाळासाहेबांच्या भाषेत बोलायला गेलं तर फार बोगस भाषण होतं,” अशी टीका प्रसाद लाड यांनी केली आहे.

एकनाथ शिंदे शिवसेना पक्षप्रमुख पदावर दावा करणार?

“जनतेला कोणतंही सोनं मिळालं नाही. सोन्याच्या रुपात पितळही मिळालं नाही. ना चांदी मिळाली, ना पितळ मिळाल, फक्त भंगार मिळालं. भंगारवाल्यांसह सत्तेत राहिल्याने भंगारच लुटायची वेळ आली आहे. भंगारच लुटायचं काम त्यांनी केलं,” असा टोलाही त्यांनी लगावला.

‘शिवसेनेचा झेंडा आणि राष्ट्रवादीचा अजेंडा’, CM शिंदेंच्या टीकेला अजित पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले “माझ्या बाजूला बसायचे तेव्हा…”

“सर्जिकल स्ट्राइक कोणी केला हे उद्धव ठाकरे विसरलेत. अमित शाहांवर टीका करण्याइतकी तुमची उंची नाही. तुम्ही साधं याकूब मेमनची कबर उकरु शकला नाहीत. अमित शाहांबद्दल, पाकव्याप्त काश्मीरबद्दल बोलूच नये. मोदी, शाह हे पाकव्याप्त काश्मीर कधी भारतात घेतील हे तुम्हाला कळणारही नाही. तुमची सकाळ दुपारी १२ वाजता होते, त्यामुळे रात्री पाकव्याप्त काश्मीर कधी येईल हे तुम्हाला समजणारही नाही. आजुबाजूच्या ज्ञान देणाऱ्या त्या चांडाळ चौकडीचं ज्ञान आधी वाढवा,” असंही ते म्हणाले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“ऐकून कंटाळा आलाय, तुमच्या स्क्रिप्टरायटरला…”, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंच्या भाषणावर खोचक टोला!

संबंधित बातम्या

राज ठाकरेंच्या कोकण दौऱ्याचा कार्यकर्त्यांना नव्हता थांगपत्ता; सिंधुदुर्ग जिल्ह्याची मनसे कार्यकारिणी बरखास्त
VIDEO: राऊतांना प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली, शिवी देत म्हणाले, “*** तू यापुढे…”
“बाबासाहेब पुरंदरेंच्या विकृत व अनैतिहासिक मांडणीवर…”, राज ठाकरेंच्या भेटीनंतर जयसिंगराव पवारांचा मोठा खुलासा
मुंबईत ३ ते १७ डिसेंबर दरम्यान जमावबंदीचे आदेश; पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव; काय सुरू काय बंद? जाणून घ्या
“एक पठ्ठ्या ‘उठ दुपारी आणि घे सुपारी’ असाच कार्यक्रम…”, सुषमा अंधारेंची राज ठाकरेंवर बोचरी टीका

व्हिडिओ

ताज्या बातम्या
‘राज ठाकरे हेच खरे जातीयवादी’; जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
Dutee Chand Marriage: समलैंगिक साथीदारासोबत अ‍ॅथलीट द्युती चंदचा विवाह संपन्न, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
इंडोनेशियात विवाहपूर्व शरीरसंबंध बेकायदा ठरणार, येतोय नवीन कायदा
जॉन्सन्सची बेबी टाल्कम पावडर वापरासाठी सुरक्षित; प्रयोगशाळांतील अहवातून स्पष्ट
मुंबई: नायर दंत रुग्णालयात उभारणार अद्ययावत प्रयोगशाळा