ड्रोनचा वापर करून पिझ्झाची डिलिव्हरी करण्याची महत्त्वाकांक्षी चाचणी मुंबईतील फ्रान्सेस्को पिझेरीयातर्फे करण्यात आली. पण हे ड्रोन खरोखरीच आपल्याला
सामानांचे वितरण करेल हा दिवस कधी उजाडेल हे अद्याप सांगता येणार नाही. ड्रोनच्या नागरी उपयोगासाठी जगात कोठेही नियमावली नसल्यामुळे हा महत्त्वकांक्षी
प्रकल्प अमेझॉन या ई-रिटेल कंपनीलाही सुरू करता आलेला नाही.
अमेझॉन डॉट कॉम या ई-रिटेल कंपनीच्या संशोधन आणि विकास विभागाने वस्तूंचे वितरण करणारे चार पंखांचे विमान तयार केले आहे. याच्या साहय्याने डिलिव्हरी करण्याचा अमेझॉनचा मानस आहे. या संदर्भात त्यांनी डिसेंबर महिन्यात घोषणाही केली होती. पण या ड्रोन डिलिव्हरीच्या स्पध्रेत मुंबईतील पिझा दुकानाने बाजी मारली आणि ११ मे रोजी ते चाचणी करूनही मोकळे झाले. अर्थात चाचणी केल्यानंतर या संदर्भात अमेरिकेत तयार होत असलेल्या नियमांकडे आमचे लक्ष असल्याचेही दुकान प्रमुखांतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. हवेत ४०० फूटांपेक्षा जास्त उंचीवर कोणतेही उपकरण डवायचे असेल तर त्याला विविध परवानग्या घ्याव्या लागतात.
इतकेच नव्हे तर यासाठी सध्या आपल्याकडे कोणत्याही प्रकारची नियमावलीही नाही. अमेरिकेतही तशी नियमावली नसल्यामुळेच अमेझॉनला प्रयोग करता
आला नाही. सध्या ‘अमेरिकन फेडरल एव्हिएशन अॅथॉरिटी’ (एफएए) या संदर्भात नियमावली तयार करत असून सन २०१५च्या सुरुवातीला हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा अमेझॉनला आहे. ही नियमावली जाहीर त्याचा काहीसा फायदा देशातील अशा महत्त्वाकांक्षी उपक्रमांना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भात नियम तयार करण्याबाबत अद्याप देशात कोणत्याही हालचाली नाहीत.
ड्रोन कसे काम करते
मुंबईतील वरळी येथील टॉवरमध्ये डिलिव्हरी क रण्यासाठी चाचणी म्हणून वापरण्यात आलेले ड्रोन हे अमेझॉनने तयार के लेल्या ‘प्राइम एअर’च्या तुलनेत क मी क्षमतेचे आहे. आठ कि लोमीटर अंतर कोपल्यानंतर हे ड्रोन बॅटरीची क्षमता अपुरी पडते यामुळे कोम क रण्याचे थांबते. इतके च नव्हे तर याला अंतराची मर्यादाही आहे. याउलट अमेझॉनच्या ‘प्राइम एअर’ची क्षमता जास्त असून त्यामध्ये देण्यात आलेली यंत्रणाही खूप प्रभावी आहे. यामध्ये खालच्या बाजूस सामान ठेवण्यासाठी एक डब्बा देण्यात आला आहे. हे ड्रोन इतर ड्रोनच्या तुलनेत जास्त वेगाने पळू शक ते आणि याची लांब जाण्याची क्षमताही जास्त असल्याचे अमेझॉनने स्पष्ट केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drone distribution is waiting for rules