होळी सणानिमित्त मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी टर्मिनस ते करमाळी/सावंतवाडी रोड/यशवंतपूरदरम्यान नऊ विशेष गाडय़ा चालविणार आहे. या सर्व विशेष गाडय़ांचे आरक्षण ९ मार्चपासून सुरू होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

छत्रपती शिवाजी टर्मिनस ते करमाळीदरम्यान ०२००३ आणि करमाळी ते छत्रपती शिवाजी टर्मिनसदरम्यान ०२००४ या विशेष गाडय़ा चालविण्यात येणार आहेत. ०२००४ ही गाडी १२ मार्च रोजी करमाळी येथून दुपारी १-५५ वाजता सुटून त्याच दिवशी रात्री ११-२० वाजता छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे पोहोचणार आहे. या गाडय़ांना दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम या ठिकाणी थांबे आहेत.

छत्रपती शिवाजी टर्मिनसहून सावंतवाडी रोड (०११०३) आणि सावंतवाडी रोड ते छत्रपती शिवाजी टर्मिनस (०११०४) या गाडय़ा चालविण्यात येणार आहेत. ०११०४ ही गाडी ११ मार्च रोजी दुपारी २-१५ वाजता सावंतवाडी रोड येथून सुटून छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे त्याच दिवशी रात्री ११-५५ वाजता पोहोचणार आहे. या दोन्ही गाडय़ांना दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ येथे थांबा देण्यात आला आहे.

छत्रपती शिवाजी टर्मिनस ते सावंतवाडी रोड यादरम्यान ०११०५ व सावंतवाडी रोड ते छत्रपती शिवाजी टर्मिनसदरम्यान ०११०६ ही विशेष गाडी, छत्रपती शिवाजी टर्मिनस ते सावंतवाडी रोडदरम्यान ०१०९५ आणि सावंतवाडी रोड ते छत्रपती शिवाजी टर्मिनसदरम्यान ०१०९६ ही विशेष गाडी चालविण्यात येणार आहे.

तसेच छत्रपती शिवाजी टर्मिनस ते यशवंतपूरदरम्यान ०११८५ ही विशेष गाडी १३ मार्च रोजी संध्याकाळी ५-१५ वाजता सुटणार आहे. ही गाडी दुसऱ्या दिवशी रात्री आठ वाजता यशवंतपूर येथे पोहोचणार आहे. या गाडीला लोणावळा, पुणे, मीरज, धारवाड, हुबळी, बीजूर जंक्शन आदी ठिकाणी थांबे देण्यात आले आहेत.

 

 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian railways