‘लोकसत्ता मार्ग यशा’चा चर्चासत्रात तज्ज्ञांचे मार्गदर्शन

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

करिअरसाठीची शोधाशोध सुरू होते, ती शालेय जीवनापासूनच, पण या शोधाला खरा वेग येतो तो दहावी-बारावीच्या वर्षांमध्ये. या वेगाला जर चांगली दिशा मिळाली तर मग हा शोध अधिक सुकर होतो. याच विषयात विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी ‘लोकसत्ता’तर्फे ‘मार्ग यशाचा’ ही करिअर कार्यशाळा घेतली जाते. येत्या २४-२५ मे रोजी रवींद्र नाटय़मंदिर, प्रभादेवी येथे ही कार्यशाळा होत आहे. विविध विषयांतील तज्ज्ञ या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.

करिअर म्हटले की ताण हा आलाच. तो कसा हाताळावा याविषयी मार्गदर्शन करतील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे, तर करिअर निवड कशी करावी हे सांगतील करिअर समुपदेशक विवेक वेलणकर. इंजिनीअरिंग, मेडिकल ही विद्यार्थ्यांना भुरळ घालणारी क्षेत्रे. या क्षेत्रातील करिअर नेमके कसे घडवावे, याविषयी या क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. विजय सुरासे आणि प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. अमोल अन्नदाते, तर इंजिनीअरिंग क्षेत्रातील करिअर संधींविषयी बोलतील या क्षेत्रातील ३० वर्षांहून जास्त अनुभव असणारे आणि पीएचडी मिळवलेले डॉ. जयंत पानसे. यूपीएससी आणि एमपीएससी या देशातील सगळ्यात लोकप्रिय स्पर्धा परीक्षा. त्यांच्या तयारीचा कानमंत्र देणार आहेत याच परीक्षेत यश मिळवलेले विद्यार्थी. एमपीएससी उत्तीर्ण आणि सध्या नाशिक जिल्ह्य़ाचे  ‘प्रोबेशनरी डेप्युटी सीईओ ’ म्हणून काम पाहणारे अनिल नागणे आणि यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊन भारतीय संचार वित्त सेवेत काम करणारे मंदार देशपांडे विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. याचबरोबर करिअरच्या वेगळ्या वाटा या चर्चासत्रात शेफ देवव्रत जातेगावकर, चित्रकला आणि करिअर या विषयावर बोलतील चित्रकार, समीक्षक महेंद्र दामले. अभिनयातील करिअरविषयी बोलतील लेखक, दिग्दर्शक व अभिनेता अभिराम भडकमकर. या कार्यशाळेसाठी विद्यार्थ्यांना प्रवेशिका घेणे आवश्यक आहे.

  • टायटल पार्टनर – आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ुशन्स.
  • असोसिएट पार्टनर – विद्यालंकार क्लासेस, झील अकादमी आणि संदीप युनिव्हर्सिटी.
  • पॉवर्ड बाय पार्टनर – एडय़ुरशिया (ओव्हरसीज अ‍ॅडमिशन्स फॉर मेडिकल, इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड एमबीए), गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर एज्युकेशन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट, के ११ अकॅडमी ऑफ फिटनेस सायन्स, कैझेन मल्टिमीडिया, संकल्प मेश्रामज द आर्ट ऑफ सिनेमा कोर्सेस, उत्क्रांती राइज अ‍ॅण्ड राइज, युक्ती इंजिनीअरिंग, मेडिकल अ‍ॅण्ड फाऊंडेशन.

प्रवेशिका १५ मेपासून खालील ठिकाणी सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत उपलब्ध :

१. रवींद्र नाटय़मंदिर, प्रभादेवी, मुंबई</p>

२. लोकसत्ता कार्यालय, सातवा मजला, मफतलाल सेंटर, नरिमन पॉइंट, मुंबई

३. विद्यालंकार हाऊस, प्लॉट क्रमांक ५६, हिंदू कॉलनी, पहिली गल्ली, दादर (पूर्व)

४. झील अकादमी – अंधेरी, तळ मजला, उत्कर्ष बिल्डिंग, बाटा शॉपजवळ, अंधेरी पश्चिम   स्थानकासमोर, संपर्क : ८६५२७७९५९७.

५. झील अकादमी – गोरेगाव, क – १०१, सुमित समर्थ आर्केड, आरे रोडसमोर, जैन मंदिर, गोरेगाव (प) मुंबई, संपर्क : ८६५२७७८५५३.

याचबरोबर या कार्यक्रमाची तिकिटे १५ मेपासून https://www.townscript.com/e/loksatta-marga-yashacha-mumbai-234014 येथेही उपलब्ध होतील.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta marg yashacha