132 Naxals died in Chhattisgarh border and Gadchiroli district in eleven months | Loksatta

छत्तीसगड सीमाभाग आणि गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल चळवळीला हादरे; अकरा महिन्यात १३२ नक्षल्यांचा मृत्यू

या अकरा महिन्यात नक्षलवाद्यांनी ३१ पोलीस जवानांसह ६९ पोलीस खबऱ्यांना मारल्याची माहिती समोर आली आहे.

-naxal
छत्तीसगड सीमाभाग आणि गडचिरोली जिल्ह्यात अकरा महिन्यात १३२ नक्षल्यांचा मृत्यू (संग्रहित छायाचित्र)

गेल्या ११ महिन्यात तब्बल १३२ नक्षल्यांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. पीपुल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मीच्या (पीएलजीए) २२ व्या स्थापनादिनानिमित्त नक्षल्यांनी काढलेल्या पत्रकात याबाबत उल्लेख केला आहे. यात त्यांनी ३१ पोलीस जवानांसह ६९ पोलीस खबऱ्यांना मारल्याचा दावा केला आहे. येत्या २ ते ८ डिसेंबर दरम्यान हा सप्ताह पाळण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

हेही वाचा- पीक विम्याची रक्कम तुटपुंजी; रविकांत तुपकरांनी गाठले कृषी अधीक्षक कार्यालय, अन् मग…

मागील दोन वर्षात नक्षल चळवळीला अनेक मोठे हादरे बसले आहे. पोलिसांनी राबवलेल्या प्रभावी कारवायांमुळे छत्तीसगड सीमाभाग आणि गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल्यांचे महत्त्वाचे नेते मारले गेले. वृद्ध नक्षली नेते अबुझमाडमध्ये विसावले. यामुळे ही हिंसक चळवळ नेतृत्वहीन झाल्याचे चित्र आहे. त्यानुषंगाने अस्तित्व दाखवण्यासाठी आता नक्षल्यांनी पत्रकांचा आधार घेत ‘पीएलजीए’ स्थापना दिनानिमित्त बंद पाळण्याचे आवाहन केले आहे. यात त्यांनी मागील ११ महिन्यात तब्बल १३२ नक्षली मारल्या गेल्याचे मान्य केले आहे. सोबतच ३१ पोलीस जवानांसह ६९ खबऱ्यांना मारल्याचा देखील दावा केला आहे. भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये करण्यात आलेली कारवाई बेकायदेशीर असून ‘यूएपीए’सारखा कायदा रद्द करण्याबाबत नक्षल्यांनी पत्रकात म्हटले आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-11-2022 at 23:14 IST
Next Story
पीक विम्याची रक्कम तुटपुंजी; रविकांत तुपकरांनी गाठले कृषी अधीक्षक कार्यालय, अन् मग…