नागपूर: शनिवारी नागपुरात आलेल्या पुरामुळे शहराच्या काही भागात मोठ्या प्रमाणात हानी झाली. शासनाने केलेल्या सर्वेक्षणातून जे आकडे पुढे आले त्यावरून पुराची व्यापकता किती होते हे स्पष्ट होते. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार पुरामुळे नागपूर शहरातील १५ हजार कुटुंबे बाधित झाली. ११,२३८ घरे, ३०० दुकाने व टपऱ्यांना फटका बसला.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
हेही वाचा >>> व्हिडीओ गेम खेळणाऱ्या मुलाची रेल्वेखाली आत्महत्या
५ घरे पूर्णत:तर १४९ घरांचे अंशत: नुकसान झाले. नदी-नाल्यावरील ३ पूल खचले, विविध ठिकाणी एकूण १०,३०१ मीटर नाला भिंत कोसळली. ३७,१९० मीटर रस्त्याचे नुकसान झाले आहे. १४ गुरांचे मृत्यू झाला. सर्वेक्षण करण्यासाठी १४५ कर्मचाऱ्यांचे एकूण ५० पथक तयार केल्या असून ७४०० घरांचे पंचनामे झाले आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ६१४२ हेक्टरमध्ये पीकांचे तर ६०० घरांचे नुकसान झाले.
First published on: 27-09-2023 at 18:48 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 15000 families affected 11000 houses damage due to major flood in nagpur cwb 76 zws