गोंदिया : विदर्भाच्या मातीत अनेक कलावंतांनी जन्म घेऊन रंगदेवतेची सतत रंगभूमीवर नानाविध प्रयोग करून आपल्या अभिनयाची छाप पाडली. आणि झाडीपट्टी हे एक व्यासपीठ तयार झाले. या रंगभूमीची सेवा करण्यासाठी वडसा, देसाईगंज येथे शेकोडोच्या संख्येने झाडीपट्टीत नाटक मंडळाच्या ऑफिस, बुकींग केंद्र अश्या दुकानदाऱ्या थाटल्याचे चित्र पाहावयास मिळते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विदर्भातील नावाजलेली झाडीपट्टी नाटकांच्या माध्यमातून पोहचलेली आहे. या कलादालनात आता हजारोच्या कलाकृतीने रंगभूमी ही नाटकाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य अविरत करीत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागातील गावकुसात राहणारा कलाकार आता झाडीपट्टी व झाडीवूडच्या पडद्यावर चमकताना दिसतो. ही अभिनयाची छावणी म्हणावी लागेल. या झाडीपट्टीमध्ये उच्चशिक्षित कलेच्या व नाटकाचे विषयाचे शिक्षण घेऊन संशोधनही करतात. वेगवेगळ्या प्रकारच्या नाटकाचा इतिहास कसा होता. कोणत्या नाटका कोणत्या कालावधीत प्रसिद्ध होऊन नावारुपास आल्या याचाही शोध झाडीपट्टीच्या लेखकांनी, इतिहासकारांनी; संशोधकांनी व कलावंतांनी घेतला आहे. पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक व लावणीप्रधान नाटकांमधून समाजाला प्रबोधनात्मक संदेश देण्याचा काम आजही झाडीपट्टी करीत आहे.

हेही वाचा >>> माता मृत्यूप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करा; खासदार अशोक नेते यांनी अधिकाऱ्यांना खडसावले

पोळा संपला की झाडीपट्टीच्या मातीत रंगभूमीची अविरत सेवा करण्यासाठी शंभराहुन  अधिक नाटक कंपन्या सुरू झाल्या आहेत. उत्तम व दर्जेदार नाटके चांगली सादर करता येईल अश्यांची मोठ्या प्रमाणावर बुकिंग सुरू झाली आहे. अनेक लेखकांनी विविध नाटके लिहून मंडळाला दिल्या. कलाकारांच्या तालीमाची रंगतगंमत सुरू झाली. कलेला नवा आयाम कसा देता येईल याचाही चांगला प्रयत्न कलावंत मंडळी करीत आहेत.

झाडीपट्टी रंगभूमीला दीडशे वर्षाची परंपरा आहे. नवा शोध नेहमी कलेच्या माध्यमातून होत असतो. मनोरंजनातून प्रबोधन आणि प्रबोधनातून परिवर्तन ही नांदी झाली पाहिजे. लेखकांनी नवनवीन विषय घेऊन सर्जनशीलता तद्दांनी करावी आणि हे आवश्यक आहे. -मंगेश मेश्राम नाटकाचे अभ्यासाक

झाडीपट्टी रंगभूमीला एकूणच दीडशे वर्षाची परंपरा लाभली आहे. हा काळ फार महत्त्वाचा समजला जातो. यावर अनेकांनी आपली छाप पडली आहे .याचे खरे श्रेय रसिकांना जाते. कारण तेच खरे शिलेदार आहेत. –युवराज गोंगले लेखक निर्माता व दिग्दर्शक ,झाडीपट्टी

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A ready stage the booking of the play after diwali has started sar 75 ysh