अकोला : मध्य रेल्वेच्या मार्गावर ‘मेगा ब्लॉक’ घेतला जात असल्याने प्रवाशांना चांगलाच मनस्ताप होणार आहे. नागपूर-भुसावळ दरम्यान धावणाऱ्या तब्बल ११ गाड्यांच्या फेऱ्या वेगवेगळ्या तारखांना रद्द करण्यात आल्या आहेत. विभागात तांत्रिक कार्य करण्यासाठी हा ‘ब्लॉक’ घेतला जात आहे.

सेलू रोड स्थानक येथे ‘इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग’ कार्यासाठी विशेष ‘ब्लॉक’ घेतला जात आहे. सेलू रोड स्थानक येथे ‘यार्ड रिमोडूलिंग’ आणि ‘इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग’ कार्यासाठी ‘प्री नॉन इंटरलॉकिंग’ आणि ‘नॉन इंटरलॉकिंग’ कार्य तसेच तिसरी मार्गिका आणि चौथी मार्गिका, वर्धा-नागपुर दरम्यान ‘लाँग हॉल लूप लाईन’ला ‘कनेक्टिव्हिटी’ प्रदान करण्यात येत आहे. त्यासाठी विशेष ‘ब्लॉक’ घेतला जात आहे. भुसावळ विभागातून धावणाऱ्या गाड्यांमध्ये बदल करण्यात आला. गाडी क्रमांक १२११९ अमरावती -अजनी एक्सप्रेस १ ते ३, ५, ६, १० आणि ११ ऑगस्ट रोजी रद्द केली. गाडी क्रमांक १२१२० अजनी -अमरावती एक्सप्रेस १ ते ३, ५, ६, १० आणि ११ ऑगस्ट रोजी रद्द केली. गाडी क्रमांक १२१५९ अमरावती -जबलपूर एक्सप्रेस ०४, ०५, ०९, १० ऑगस्ट रोजी रद्द केली. गाडी क्रमांक १२१६० जबलपूर -अमरावती एक्सप्रेस ०५, ०६, १० आणि ११ ऑगस्ट रोजी रद्द केली. गाडी क्रमांक २२१२४ अजनी -पुणे हमसफर एक्सप्रेस ६ ऑगस्ट, गाडी क्रमांक २२११७ पुणे -अमरावती एक्सप्रेस ७ ऑगस्ट, गाडी क्रमांक २२१४१ पुणे -नागपुर हमसफर ०८ ऑगस्ट, गाडी क्रमांक २२११८ अमरावती -पुणे एक्सप्रेस ०८ ऑगस्ट, गाडी क्रमांक २२१४२ नागपुर – पुणे हमसफर एक्सप्रेस ९ ऑगस्ट, गाडी क्रमांक २२१३९ पुणे – अजनी हमसफर एक्सप्रेस १० ऑगस्ट व गाडी क्रमांक २२१४० अजनी – पुणे हमसफर एक्सप्रेसची ११ ऑगस्टला धावणारी फेरी रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक १२१४० नागपुर – मुंबई एक्सप्रेस ५ ऑगस्ट रोजी नागपूर विभागात ०१.४५ तास नियमित केली जाईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाकडून देण्यात आली.

हेही वाचा…वर्धेतील हिंदी विद्यापीठ पुन्हा वादात! कुलसचिवांनी राजीनामा देताच कुलगुरूंनी केले असे काही की…

मध्य रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या तब्बल ११ गाड्यांच्या फेऱ्या वेगवेगळ्या तारखांना रद्द करण्यात आल्याने प्रवाशांना ऐनवेळी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागणार आहे. मध्य रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या ‘ब्लॉक’मुळे प्रवाशांना प्रचंड गैरसोय होत असून प्रवाशांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. प्रवाशांनी सहकार्य करण्याचे आवाहन रेल्वे विभागाकडून करण्यात आले.