नागपूर: पहाटेच्या शपथविधीबाबतचे फडणवीस यांचे वक्तव्य  पुणे जिल्ह्यातील विधानसभा पोटनिवडणुकीवर डोळा ठेवून करण्यात आले आहे. केवळ दोन दिवसांच्या सरकारला शरद पवारांसारखे ज्येष्ठ नेते पाठिंबा देतील, यावर विश्‍वास बसत नाही, असे मत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नागपुरात व्यक्त केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चव्हाण एका कार्यक्रमासाठी नागपूरला आले असता त्यांचे लक्ष फडणवीस यांच्या विधानाकडे वेधण्यात आले. त्यावर त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली.

सध्या राज्यात पोटनिवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर राजकीय फायदा उचलण्यासाठी या सगळ्या विषयाची चर्चा होत आहे. पण यातून त्यांना काहीही साध्य करता येणार नाही. पोटनिवडणुकांचेही निकाल त्यांना धक्का देणारेच असणार आहेत, असे ते म्हणाले. पहाटेच्या शपथविधीच्या आधी आम्ही शरद पवार यांच्यासोबत चर्चा केली होती, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते व त्यावरून राजकारण तापले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader ashok chavan reaction on fadnavis statement on ajit pawar early morning swearing in cwb