नागपूर : शिर्डी विमानतळावर प्रवाशांची दिवसेंदिवस वर्दळ वाढत असून येथे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी नवीन इमारत (टर्मिनल) उभारत आहे. नवीन टर्मिनलचे काम पूर्ण झाल्यानंतर नागपूर ते शिर्डी विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे यांनी म्हटले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एमएडीसी मिहान-सेझ, नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यतिरिक्त शिर्डी विमानतळाला प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजनेअंतर्गत (आरसीएस) नवीन टर्मिनल इमारतीसह अद्ययावत करीत आहे. शिर्डी विमानतळावर प्रारंभी ३०० प्रवाशांची ये-जा असायची. आता ही संख्या दररोज २००० झाली आहे. शिर्डी येथे सतत वाढणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी टर्मिनल इमारतीचे काम सुरू आहे. ते पूर्ण झाल्यानंतर नागपूर ते शिर्डी थेट विमानसेवेसाठी प्रयत्न केले जातील, असे स्वाती पांडे यांनी निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा – ब्रिटिशकालीन जलवाहिन्यांची गुंतागुंत! नागपूर रेल्वेस्थानक पुनर्विकास प्रकल्पाला विलंब

हेही वाचा – मायावती यांच्या दौऱ्यापूर्वी आकाश आनंद यांची १७ ला नागपुरात सभा

पांडे यांनी आज मिहान-सेझमधील विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. रस्ते, अग्निशमन सुविधा तसेच इतर पायाभूत सुविधांबाबत चर्चा झाली. तसेच येथे ३.५ दलघमी क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प तीन-चार महिन्यांत कार्यान्वित केला जाणार आहे, असे सांगण्यात आले. यावेळी पांडे यांनी सर्व भागधारकांना मिहान प्रकल्पग्रस्तांसाठी आरोग्य, कौशल्य विकास, रोजगार यासाठी सामाजिक बांधिलकी योगदानासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. तसेच सर्व भागधारकांना एकत्रितपणे दोन एकरवर ग्रीन झोन विकसित करण्याचे आवाहनही केले. मिहान सेझमधील त्यांच्या कॅम्पसमध्ये एचसीएल लिमिटेडने ही बैठक आयोजित केली होती.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Efforts will be made to start nagpur to shirdi flight service said swati pandey rbt 74 ssb