नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प आणि वाघांचे सहज होणारे दर्शन यामुळे देशविदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने इकडे येत आहेत. येथील वाघही पर्यटकांना निराश करत नाही. आतापर्यंत पर्यटकांचा ओढा ताडोबाच्या गाभा क्षेत्रातील पर्यटनाकडे होता. मात्र, आता ताडोबाचे बफर क्षेत्र पर्यटकांची पहिली पसंती ठरत आहेत. या बफरमधील वाघांच्या करामतींनी पर्यटकांना लळा लावला आहे. असाच एक व्हिडिओ पर्यटकांनी निमढेला बफर क्षेत्रात टिपला आहे. ज्यात दोन वाघ पर्यटकांची तमा न बाळगता मस्ती करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील निमढेला बफर क्षेत्रातील वाघ सध्या पर्यटकांना त्यांच्याकडे खुणावत आहेत. कधी येथील वाघ मंदिरातील देवासमोर नतमस्तक होतो, तर कधी तो पर्यटकांसाठी असलेल्या निवाऱ्याच्या छतावर चक्कर मारतो. कधी इथल्या वाघांचे बछडे मस्ती करतांना दिसतात. असाच एक व्हिडिओ डेक्कन ड्रिफ्टसचे प्रमुख व वन्यजीव अभ्यासक पीयूष आकरे, कंचन पेटकर आणि शेखर मल्लले यांनी टिपला. ताडोबाच्या निमढेला बफर क्षेत्रात “भानुसखिंडी” वाघिणीची मुलगी “नयनतारा” आणि “डेडली बॉईज” हे सूर्य मावळतीला आला असतांना मस्ती करताना आढळून आले.

हेही वाचा : सोयाबीनची उत्पादकता अधिक, नाफेडकडून खरेदी मात्र मर्यादित; शेतकऱ्यांच्या अडचणीत भर

निमढेल्यातील “नयनतारा” वाघिणीचे डोळे निळे आणि अतिशय आकर्षक आहेत. त्यावरूनच पर्यटकांनी तिला “नयनतारा” असे नाव दिले. सध्या वातावरणात मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. सायंकाळी ते पहाटेपर्यंत हलकी थंडी तर दिवसभर मात्र उकाडा.

हा उकाडा संपून थंड वाऱ्याची झुळूक येताच “नयनतारा” व “डेडली बॉईज” यांची मस्ती सुरू झाली. तब्बल दहा मिनिटे पर्यटकांनी हा क्षण डोळ्यात आणि कॅमेऱ्यात साठवला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur video of tigers playing at tadoba andhari tiger reserve in cold weather rgc 76 css
First published on: 07-02-2024 at 13:22 IST