गोंदिया : अर्जुनी मोर तालुक्याचे वैभव असलेले ईटियाडोह धरण आज २१ सप्टेंबरला सकाळी ७ वाजता ओव्हरफ्लो झाले. त्यामुळे नदी काठावरील गावांना तसेच नदीपात्रातून आवागमन करणाऱ्या सर्व नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
निसर्ग सौंदर्याने नटलेला ईटियाडोह परिसर पावसाळ्याच्या दिवसात अधिकच खुलून दिसते. संपूर्ण मातीकामाने तयार करण्यात आलेला इटियाडोह धरण गाढवी नदीवर बनविण्यात आलेला आहे. सुट्ट्यांच्या दिवसात हजारो पर्यटक या धरणाला भेट देतात. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या धरणावर निसर्गाने सौंदर्याची मुक्त उधळण केली आहे.
हेही वाचा – विदर्भातील एकमेव लाकडी गणपती ज्याचे विसर्जन होत नाही…
सन २०१३ नंतर तब्बल सहा वर्षांनी सन २०१९ ला आणि मागील वर्षी १५ ऑगस्ट २०२२ ला इंटियाडोह धरण ओव्हरफ्लो झाले होते. आता २१ सप्टेंबर २०२३ ला पहाटे सहा वाजता इटियाडोह धरण ओव्हरफ्लो झाले. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ईटियाडोह धरण पर्वताच्या मधोमध आहे. धरणापासून भंडारा, गोंदिया, गडचिरोली
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Itiadoh dam overflow a note of caution sar 75 ssb