निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय दिल्यानंतर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी माजी मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्‍हा एकदा टीका केली आहे. ‘जो रामाचा नाही, हनुमानाचा नाही त्याच्याकडे धनुष्यबाणाचे काम नाही’ असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेबांची विचारधारा पुढे जिवंत ठेवतील, असा दावा त्‍यांनी केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- नागपूर : अमित शाह दीक्षाभूमीवर, आंबेडकरांच्या अस्थिकलशाचे  दर्शन

नवनीत राणा म्हणाल्या की, ज्यांनी बाळासाहेबांचे विचार जिवंत ठेवले नाही ते सत्तेसाठी काय संघर्ष करू शकणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच बाळासाहेबांची विचारधारा आणि धनुष्यबाण चिन्ह पुढे नेतील असा माझा ठाम विश्वास आहे. एकनाथ शिंदे यांचाच शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर हक्क आहे. बाळासाहेंबाच्या विचारांवर चालणाऱ्यांनाच ते निवडणूकीत उतरवतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. ‘जो राम हनुमान का नहीं उनके पास धनुष्य बाण का क़्या काम’ असे ट्वीटही त्यांनी केले आहे.

हेही वाचा- अमित शहा यांचा नागपूर दौरा आणि एकनाथ शिंदे यांना पक्ष-चिन्हांची भेट, काय आहे संबंध ?

नवनीत राणा यांनी यापुर्वीही अनेकदा उद्धव ठाकरे यांच्‍यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांच्‍या मातोश्री या निवासस्‍थानासमोर हनुमान चालिसा म्‍हणण्‍याचा इशारा दिल्‍यानंतर नवनीत राणा आणि त्‍यांचे पती आमदार रवी राणा यांना अटक करण्‍यात आली होती. तेव्‍हापासून त्‍यांनी उद्धव ठाकरेंवर टीकेची एकही संधी सोडलेली नाही.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navneet rana criticizes uddhav thackeray mma 73 dpj