नागपूर: नागपूर- मुंबई समृध्दी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घघाटनासाठी ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात येत आहेत. त्यांच्या कार्यक्रम स्थळात बदल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पूर्वी हा कार्यक्रम महामार्गावरील वायफड टोलनाक्याजवळ नियोजित होता. दहा ते पंधरा हजार नागरिक बसू शकतील अशी व्यवस्था केली जाणार होती. आता कार्यक्रम स्थळात बदल करण्यात आला आहे. तो मिहान मधील एम्स रुग्णालयाच्या मागच्या भागात मुख्य कार्यक्रम होणार आहे.

हेही वाचा: कुठे होणार समृध्दी महामार्गाचा उद्घाटन सोहळा?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौ-याची जय्यत तयारी सुरु आहे. रविवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी या दौ-याची पाहणी केली. त्यापूर्वी उपमुख्यमंत्र्यांनी कार्यक्रम स्थळांची पाहणी केली. या दौ-यात पंतप्रधानांच्या हस्ते समृध्दी महामार्गाच्या उद्घघाटनासह मेट्रो, वैद्यकीय, रेल्वे आणि इतर अशा अनेक प्रकल्पांना उद्घाटन होणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi will inaugurate many projects including the samriddhi highway in nagpur tmb 01