देशात दलितांवरील वाढत्या अत्याचाराचे विरोधात देशातील दलित व शेतमजुर विभागात कार्य करणा-या ५ प्रमुख संघटनाची संयुक्त समितीने दिलेल्या हाकेनुसार देशव्यापी आंदोलनातंर्गत ‘अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलन’ गोंदिया शाखातर्फे आज जिल्हा कचेरी समोर तीव्र निषेध निदर्शने करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> नागपूर : आ. सुर्वे यांचा मुलगाच आरोपी; काय म्हणाले वरुण सरदेसाई ?

भारताचे राष्ट्रपती यांच्या नावे उपविभागीय अधिकारी यांना त्यांच्या कार्यालयात २१ मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यात दलित, आदिवासी, भटके व तत्सम निम्न जातीयांवर होत असलेले अत्याचार, ‘ॲट्रासिटी’ कायद्याची कड़क अंमलबजावणी अनसुचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांच्या होणा-या संस्थागत हत्यांच्या विरोधात कायदा करणे, खासगीकरण क्षेत्रात आरक्षण, जातनिहाय जनगणणा इत्यादि मुद्द्यांचा समावेश होता. या निदर्शने आंदोलनात प्रामुख्याने ‘आयटक’चे काॅम्रेड हौसलाल रहांगडाले, मिलिंद गनविर, रामचंद्र पाटील, करूणा गनविर, प्रल्हाद ऊके,सुरेश रंगारी चरणदास भावे, गुणवंत नाईक, क्रांती गणवीर, जितेंद्र गजभिए, एवन मेश्राम, गंगाराम भावे, राजेंद्र गजभिए, अविनाश साऊसकार, हरीणखेडेसह अनेकांचा सहभाग होता.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Protest against increasing atrocities on dalits community across india sar 75 zws