शहरातील घुटकाळा वार्ड परिसरात असलेल्या तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरील एका गल्लीत ७० वर्षीय जुनी तीन मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. यामध्ये शबाना खान नामक महिला दबल्या गेली आहे. पुंडलिक पाटील नामक व्यक्तीची ही इमारत असून ७० ते ८० वर्ष जुनी तीन मजली इमारत होती. या इमारतीत शबाना खान या एकट्याच राहत होत्या.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
दरम्यान, घटनेची माहिती मिळतात शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच महानगरपालिकेचा अग्निशमन विभाग व वैद्यकिय पथक घटनास्थळी दाखल झाले होते. घटनास्थळी गर्दी झाल्याने पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणून जेसीबीच्या साह्याने महिलेला बाहेर काढण्याची काम सुरू केले होते. शहरात अनेक जुन्या उमारती उभ्या आहेत. जीर्ण झालेली इमारत कोसळल्याने या घटनेला सर्वस्वी महानगरपालिका जबाबदार असल्याचे बोलले जात आहे.
First published on: 30-09-2022 at 17:14 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Seventy years old building collasped ghutkala ward in chandrapur tmb 01