लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाशिक: लासलगाव ते विंचुर रस्त्यावर असलेल्या ॲक्सिस बँकेचे एटीएम यंत्र चोरट्यांनी वाहनातून पळवून नेल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. पोलिसांनी नाकाबंदी करून संशयित वाहनाचा पाठलाग केला असता चोरट्यांनी एटीएम यंत्र पोलिसांच्या गाडीवर फेकत पोबारा केला.

लासलगाव- विंचुर रस्त्यावर ॲक्सिस बँक असून एटीएम बँकेलगतच्या गाळ्यात आहे. रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी एटीएम यंत्र काढून सोबत आणलेल्या वाहनातून पळवून नेले. या घटनेचा प्रकार एटीएममधील सीसीटीव्हीत कैद झाला. या घटनेनंतर पोलिसांनी नाकाबंदी केली. पोलिस नाईक योगेश शिंदे, सुजित बारगळ यांनी एका खासगी गाडीद्वारे चोरट्यांचा पाठलाग केला असता चोरट्यांनी एटीएम यंत्र नाशिक-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील बोकडदरे शिवारात पोलिसांच्या खासगी गाडीवर फेकून पलायन केले. या प्रकरणी लासलगाव पोली ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Atm machine stolen from vehicle thieves gang ran away by fooling police in nashik mrj