जळगाव : रील करणाऱ्या मुलाची हत्या करून माजी सैनिकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी धरणगाव तालुक्यात उघडकीस आली होती. त्यानंतर माझ्या पतीची हत्या सासऱ्यांनी नाही तर त्याच्या काकांनी केल्याचा आरोप मृत विकीच्या पत्नीने केला आहे. दुसरीकडे विकी पाटील याच्या आईने माझ्या पतीनेच मुलाची हत्या करून स्वत:ही जीवन संपवल्याचा दावा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माजी सैनिक असलेल्या विठ्ठल पाटील यांनी मुलाची हत्या केली. त्यानंतर स्वत:ही गळफास घेतला. सुरुवातीला या प्रकरणाचे नेमके कारण समोर आले नव्हते. मात्र, मुलाकडून होत असलेल्या सततच्या छळाला कंटाळून विठ्ठल पाटील यांनी त्यांचा मुलगा विकी पाटील याची हत्या केली. आणि मग स्वत:ही जीवन संपवल्याचे चिठठीवरून स्पष्ट झाले. माझा मुलगा विकी जास्त दारू प्यायचा, त्याच्या वडिलांचे तो अजिबात ऐकायचा नाही. वडील त्याला खूप समजवायचे, पण तो त्यांना मारहाण करायचा, घरात असलेल्या वस्तूही फोडायचा. आम्ही पोलीस ठाण्यात वारंवार तक्रार केली, पण पोलिसांनी त्याकडे लक्ष दिले नाही. म्हणून माझ्या पतीचा नाईलाज झाला. ही घटना त्यांनी स्वत:हून केली आणि चिठ्ठीही लिहिली. ते माझ्याच पतीचे अक्षर आहे. मी त्यांचे अक्षर ओळखते, असा दावा विठ्ठल पाटील यांची पत्नी संगीता पाटील यांनी केला आहे.

दुसरीकडे, मृत विकी पाटीलची पत्नी पायल पाटील हीने वेगळाच दावा केला आहे. माझ्या सासऱ्यांना शर्टाचे बटणही लावता येत नव्हते. ते त्यांच्या मुलाची हत्या करू शकत नाहीत, असे पायल पाटील यांनी म्हटल्याने याप्रकरणाचा गुंता आणखी वाढला आहे. त्याचा उलगडा करण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dharangaon former soldier killed his son then committed suicide vickys wife alleged her husband was murdered by his uncle sud 02