नाशिक : ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमिवर नाशिक ग्रामीण पोलिसांकडून घोटी आणि मालेगाव शहर परिसरात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या चार जणांविरुध्द कारवाई करण्यात आली. अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती आणि आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाने ही कारवाई झाली. मालेगाव येथील आझादनगर पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर शब्बीर नगर परिसरात अश्पाक शेख (२४) , तारीक शेख (२५) यांच्या ताब्यातून धारदार तलवार, गोलाकार पाते असलेली कुऱ्हाड जप्त केली. त्यांच्याविरूध्द आझाद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : मनमाड : बिबट्या आल्याची अफवा अन् वन विभागाची धावपळ

तसेच इगतपुरी तालुक्यातील घोटी परिसरातील वासाळी ते बारशिंगवे रस्त्यावर संजय गभाले (३५), सुधीर कोरडे (३०, रा. वासाळी) यांच्या ताब्यातील वाहनात विनापरवाना असलेली धारदार तलवार मिळाली. संशयितांविरूध्द घोटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. यापुढेही अवैधपणे शस्त्रे बाळगणाऱ्यांविरोधात मोहीम सुरू राहणार असून नागरिकांनी अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्यांविषयी माहिती असल्यास ६२६२२५६३६३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nashik sword axe seized from four suspects ahead of 31 st december css