नाशिक: शहरातील त्र्यंबक नाक्याजवळ शिवशाही बसचे ब्रेक नादुरुस्त झाल्याने बसच्या धडकेत दोनपेक्षा अधिक वाहनांचे नुकसान झाले. दुचाकीस्वार महिला गंभीर जखमी झाली. अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा: नाशिक: पेट्रोल फुगे फेकून एकास जिवंत जाळण्याचा प्रयत्न

छत्रपती संभाजीनगर-नाशिक ही शिवशाही शहरातील त्र्यंबक नाका परिसरात आली असता बसचे ब्रेक नादुरुस्त झाले. त्यामुळे बसची दोन दुचाकींना धडक बसली. या धडकेमुळे महिला गंभीर जखमी झाली. तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर लोकांनी बसच्या काचा फोडल्या. राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी, मुंबई नाका पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त बस तातडीने बाजूला करुन रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला. मुंबई नाका पोलिसांनी चालक गोपाल कोळी (४५) याला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सायंकाळी उशीरापर्यंत सुरू होते.