नाशिक: मागील भांडणाची कुरापत काढून ४२ वर्षाच्या व्यक्तीवर पिता-पुत्राने पेट्रोलने भरलेले फुगे फेकून जाळण्याचा प्रयत्न केला. मारहाणही करण्यात आली. या प्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा : फडणवीस, बावनकुळेंवर विश्वास नसल्याने दिल्लीतील पक्षश्रेष्ठींच्या विभागनिहाय बैठका, जयंत पाटील यांचा चिमटा

नांदगाव येथील हुतात्मा चौक परिसरात गोरख औशिकर यांच्यावर मागील भांडणाची कुरापत काढून राहुल पिरनाईक (४०, रा. हनुमान नगर) आणि त्यांच्या मुलाने प्लास्टिक पिशवीत पेट्रोल भरुन ते फुगे औशिकर यांच्या अंगावर फोडून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. औशिकर यांनी बचावाचा प्रयत्न केला असता त्यांना मारहाण करण्यात आली. हा प्रकार परिसरातील लोकांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी संशयित राहुल याला ताब्यात घेतले. दरम्यान, संशयिताचा मुलगा अल्पवयीन आहे की काय, याविषयी कागदपत्रांची तपासणी सुरू असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक सुनील बढे यांनी दिली.

Story img Loader