Lal Bahadur Shastri Tower closed on Jayanti Day bjp agitation in nashik | Loksatta

जयंतीदिनी लालबहादूर शास्त्री टाॅवर बंद; भाजपातर्फे निषेध

जयंतीदिनी लालबहादूर शास्त्री टाॅवर बंद असल्यामुळे भाजपातर्फे प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला.

जयंतीदिनी लालबहादूर शास्त्री टाॅवर बंद; भाजपातर्फे निषेध
जयंतीदिनी लालबहादूर शास्त्री टाॅवर बंद

माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त रविवारी सकाळी शास्त्री टॉवर येथे अभिवादन करण्यासाठी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आले. मात्र, त्यांना टॉवरचा दरवाजा बंद असल्याचे दिसून आले. त्यामुळे भाजपाने महापालिकेच्या विरोधात घोषणाबाजी करीत दरवाजाला हार घालून प्रशासनाचा निषेध केला.

हेही वाचा- नाशिक : स्वच्छ, हरित देवळाली छावणी मंडळ देशात प्रथम

सकाळी नऊला भाजपाचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते शास्त्री टॉवर येथे गेले. मात्र, शास्त्री टॉवरच्या दरवाजाला कुलूप लावलेले आढळून आले. यावर भाजपाने तीव्र नाराजी व्यक्त करीत टॉवरच्या मुख्य दरवाजाला पुष्पहार घालून तीव्र निषेध करीत महापालिकाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

हेही वाचा- केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेचा निकाल जाहीर; जळगाव ८४, तर भुसावळ ९८ व्या स्थानी

याप्रसंगी महानगराध्यक्ष सूर्यवंशी यांनी महापुरुषांची जयंतीही जळगावकर साजरे करू शकत नाहीत. त्यांना मानवंदना करू शकत नाहीत, यापेक्षा मोठी अपमानकारक गोष्ट नाही, असे सांगितले. यासंदर्भात महापालिका अधिकार्‍यांशी नगरसेवक व जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी यांनी संपर्क करीत चौकशीही केली. मात्र, अधिकार्‍यांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. आज सुट्टीचा दिवस आहे, चावीची व्यवस्था होऊ शकली नाही, असे उत्तर देण्यात आले. आयुक्तांशीही भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत महापालिका प्रशासनाने या बाबीची दखल घ्यावी व संबंधितांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केल्याचेही सांगितले.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
नाशिक : स्वच्छ, हरित देवळाली छावणी मंडळ देशात प्रथम

संबंधित बातम्या

VIDEO: “अनेक मुलींचे खून हिंदू मुलांकडूनही झालेत आणि…”, ‘लव्ह जिहाद’वर बोलताना संजय राऊतांचं मोठं विधान
नाशिकमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांत गोंधळ
कांदा गडगडल्याने ‘रास्तारोको’
नाशिक : आठवडाभरात कांदा दरात ५०० रुपयांची तेजी, चांगल्या प्रतीच्या मालाची आवक घटल्याचा परिणाम
राहुल गांधींकडून ५० खोक्यांचा उल्लेख, शिंदे गटातील मंत्री दादाजी भुसेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, “लोक हसायला…”

व्हिडिओ

ताज्या बातम्या
धारावी पुनर्विकास प्रकल्प हे धारावीकरांसाठी स्वप्न नव्हे, मृगजळच!
हैद्राबादच्या निजामाची महाबळेश्वर येथील २५० कोटींच्या संपत्तीवर सातारा जिल्हाधिकाऱ्यांची धडक कारवाई
VIDEO : “तुम्ही इथेही बुलडोझर चालवणार का?” पाटणा उच्च न्यायालयाने बिहार पोलिसांना सुनावले
विश्लेषण : राज्य सरकारची ई – ऑफिस प्रणाली काय आहे? त्यामुळे लोकांची कामे वेळेत होणार का?
जुळ्यांचा नादच खुळा! दोन बहिणींनी एकाच तरुणासोबत थाटला संसार, नवऱ्याच्या अंगलट येणार?