मालेगाव सटाणा रस्त्यावरीलआराई फाट्याजवळ आज (दि.२३) दुपारी झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले. भरधाव वेगाने जाणारी कार झाडावर आदळल्याने हा अपघात घडला. देवळा येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक रामराव आहेर (वय ६५), विजय जाधव (वय ६८, रा.सातमाने) व गौरी निकम (वय १३,) रा.आघार) अशी मृतांची नावे आहेत. आहेर हे तालुक्यातील आघार येथे नातेवाईकांकडे आले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नातेवाईकांना भेटल्यानंतर ते आपले व्याही गोविंद जाधव व नात गौरी यांना घेऊन कारने सटाण्याकडे निघाले असता दुपारी १२.४५ वाजेदरम्यान टायर पंक्चर झाल्याने नियंत्रण सुटलेली कार एका झाडावर आदळली. त्यात वाहनचालक आहेर हे जागीच ठार झाले. तर गौरी व विजय जाधव हे गंभीर जखमी झाले.  अपघातानंतर रस्त्याने जाणारे नागरिक व शेतात वास्तव्यास असलेले आसपासचे रहिवासी मदतीला धाऊन आले. त्यांनी दोन्ही जखमींना तातडीने मालेगाव येथे उपचारासाठी रवाना केले. परंतु उपचारापूर्वीच वाटेत त्यांचेही निधन झाले. सटाणा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Satana accident three died nashik