नाशिक : सर्व्हर डाऊनमुळे एमबीए पूर्व परीक्षेत गोंधळ; शेकडो विद्यार्थ्यांना फटका

ऑनलाइन पेपरदरम्यान तांत्रिक समस्येमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे वर्ष वाया जाण्याची भीती अनेकांनी व्यक्त केली.

Nashik pre MBA exam
नाशिक : सर्व्हर डाऊनमुळे एमबीए पूर्व परीक्षेत गोंधळ; शेकडो विद्यार्थ्यांना फटका (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

नाशिक – व्यवस्थापन शास्त्र (एमबीए) अभ्यासक्रमाच्या पूर्व परीक्षेत सर्व्हर अकस्मात बंद पडल्याने शेकडो विद्यार्थ्यांना विहित मुदतीत पेपर सोडविणे शक्य झाले नाही. या प्रकाराने पंचवटीत हिरावाडीतील परीक्षा केंद्रांवर गोंधळ उडाला. विद्यार्थी संतप्त झाल्याचे पाहून केंद्रातील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना पाचारण केले. ऑनलाइन पेपरदरम्यान तांत्रिक समस्येमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे वर्ष वाया जाण्याची भीती अनेकांनी व्यक्त केली.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

व्यवस्थापन शास्त्र (एमबीए) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी शनिवारी एमएच सीईटी ऑनलाइन पूर्व परीक्षा होती. सकाळच्या सत्रात सर्व्हरच्या दोषामुळे शेकडो विद्यार्थ्यांना पेपर सोडविता आला नाही. सकाळी नऊ ते साडेअकरा या वेळेत ही परीक्षा होती. नाशिक वेब सोल्युशन्सकडून हिरावाडीतील एनआयटी महाविद्यालयात परीक्षेची व्यवस्था करण्यात आली होती. विद्यार्थी वेळेपूर्वीच दाखल झाले होते. तांत्रिक कारणाने पेपर उशिराने सुरू झाला. पेपरसाठी १५० मिनिटांचा वेळ होता. परंतु, टाईमरवर तो एक तास ८० मिनिटे दर्शविला जात असल्याने अनेकजण संभ्रमात सापडले. पेपर सोडविताना कच्ची आकडेमोड करण्यासाठी कोरा कागद दिला जातो. केंद्राने तो उपलब्ध केला नसल्याने घोषणाबाजी झाली. नंतर सर्व्हर डाऊनने सर्वांना अडचणीत आणले. अकस्मात यंत्रणेने मान टाकल्याने अनेकांना पेपर सोडविता आला नाही. सर्व्हर डाऊन असल्याचा संदेश संगणकावर बराच काळ दिसत होता. नंतर सर्व्हर काही काळ सुरू झाला. तेव्हा काहींना आपला अर्धवट पेपर परस्पर दाखल झाल्याचे दिसले. अनेकांच्या पेपरचे नेमके काय झाले, हे स्पष्ट झाले नाही. या प्रकाराने विद्यार्थी संतापले. त्यांनी केंद्राची जबाबदारी सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांना जाब विचारला.

हेही वाचा – अमळनेर तालुक्यातील पेट्रोलपंपावर लुटीचा थरार; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

हेही वाचा – नाशिक : दहावीतील विद्यार्थ्यावर टोळक्याचा कोयत्याने हल्ला

एमबीए पूर्वपरीक्षेत उडालेल्या गोंधळामुळे विद्यार्थी संतापले. केंद्रावर गोंधळ निर्माण झाल्यामुळे व्यवस्थापनाने पोलिसांना बोलावून घेतले. विद्यार्थ्यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल पोलिसांना माहिती दिली. परीक्षेचे संचालन करणारे कर्मचारी कुठलेही सहकार्य करीत नसल्याची तक्रार करण्यात आली. तांत्रिक दोषामुळे अनेकांचे पेपर दाखल झाले नाही. ज्यांचे दाखल झाल्याचे सांगितले जाते, त्यांना तो दाखल झाल्याची कुठलीही लिखित माहिती दिली गेली नसल्याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष वेधले. तांत्रिक गोंधळामुळे आमचे वर्ष वाया जाऊ शकते. नियोजन व तांत्रिक यंत्रणेतील समस्येने परीक्षेतील आमचे भवितव्य अधांतरी बनल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. वेळ बाकी असताना अर्धवट स्थितीत दाखल झालेले आणि पेपर दाखल होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांनी ही पूर्वपरीक्षा पुन्हा नव्याने आयोजित करण्याची मागणी केली आहे. शहरातील इतर काही केंद्रांवर याच दिवशी ही परीक्षा होती. तिथे काही मिनिटांचा अपवाद वगळता पूर्वपरीक्षा सुरळीत पार पडल्याचे सांगितले जाते.

Nashik News (नाशिक / उत्तर महाराष्ट्र न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-03-2023 at 20:24 IST
Next Story
नाशिक : दहावीतील विद्यार्थ्यावर टोळक्याचा कोयत्याने हल्ला
Exit mobile version