-
काँग्रेस नेते राहुल गांधी माओवाद्यांची भाषा वापरत आहेत. काँग्रेसशासित राज्यांमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी कंपन्या ५० वेळा विचार करतील, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केली.
-
झारखंडमधील जमशेदपूर येथे भाजप उमेदवाराच्या प्रचार सभेला संबोधित करताना मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर कडाडून टीका केली.
-
देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष असलेला काँग्रेस लोकसभेच्या जागा ‘वडिलोपार्जित मालमत्ता’ मानत असल्याचे सांगून पंतप्रधान मोदी यांनी या पक्षावर घराणेशाहीचे राजकारण करत असल्याचा आरोप केला.
-
“राहुल गांधी यांनी वापरलेली भाषा कोणत्याही उद्योगपतीला पक्षाची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी ५० वेळा विचार करायला लावेल.”
-
“राहुल गांधी हे माओवाद्यांकडून बोलली जाणारी भाषा वापरत असून नवनवीन पद्धतीने पैसे उकळत आहेत”, असे पंतप्रधान म्हणाले.
-
“काँग्रेसला अदानी-अंबानींकडून भरपूर पैसे मिळतात असे पंतप्रधान बोलतात, पण त्यांची चौकशी करण्याची त्यांची हिंमत नाही,” असे काही दिवसांपूर्वी नवी दिल्लीत राहुल गांधी यांनी म्हटले होते. हाच धागा पकडून मोदींनी राहुल गांधींवर टीका केली.
-
“भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने नक्षलवाद्यांचा कणा मोडला आहे, परंतु काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षांनी निधी उकळण्याची जबाबदारी घेतली आहे.”
-
“काँग्रेस आणि इंडिया आघाडीतील पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांतील मुख्यमंत्री राहुल गांधी यांच्या उद्योगविरोधी आणि उद्योजकविरोधी भाषेशी सहमत आहेत का?” असा सवाल मोदींनी विचारला. (सर्व फोटो BJP Jharkhand या फेसबुक पेजवरुन साभार.)

ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन; ‘ठरलं तर मग’ मालिकेत साकारत होत्या पूर्णा आजीची भूमिका, सिनेविश्वावर शोककळा