-
प्रसिद्ध अभिनेत्री आणि आता भाजपा खासदार असलेल्या कंगना रणौत गेल्या तीन-चार वर्षांपासून त्यांच्या राजकीय वक्तव्यांमुळे खूप चर्चेत राहिल्या.
-
महाराष्ट्रातील राजकारणात मविआ सरकार असताना उद्धव ठाकरे यांच्याशी उडालेले खटके ते आता थेट खासदार म्हणून लोकांतून निवडून येण्यापर्यंत कंगना यांच्याभोवती मागील काही वर्षात राजकारण फिरल्याचे पाहायला मिळाले.
-
मागील आठवड्यात त्यांचे चंदीगड विमानतळावर सुरक्षारक्षकाशी वाद झाले त्यानंतर सुरक्षारक्षकावर कारवाईही करण्यात आली.
-
एकूणच कंगना त्यांच्या बिनधास्त वक्त्यव्यांसाठी प्रसिद्ध आहेत.
-
बॉलीवूडमध्ये सुपरहिट ठरल्यानंतर त्यांनी सक्रिय राजकारणासाठी भाजपा पक्षाकडून हिमाचल प्रदेशमधून लोकसभा निवडणूक लढवली.
-
मूळच्या हिमाचल प्रदेशमधील असलेल्या कंगना रणौत यांनी मंडी मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जिंकलीही आहे.
-
दरम्यान त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार कंगना यांचं शिक्षण फक्त बारावी पर्यंतच झालं आहे.
-
कंगना यांनी एका टीव्ही मुलाखतीत सांगितले की त्यांना वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर करायचे होते, परंतु त्यांचे ते स्वप्न अधुरेच राहिले.
-
त्यानंतर त्यांनी त्यांचा मोर्चा अभिनय क्षेत्राकडे वळवला आणि तिथे प्रचंड प्रमाणात यश मिळविले.
-
कंगना रणौत यांनी बॉलीवूडमध्ये काम करताना २०१४ मध्ये न्यूयॉर्क फिल्म अकॅडमीमधून मॉडेलिंगचा कोर्स पूर्ण केला आहे. (सर्व फोटो साभार- कंगना रणौत फेसबुक पेज) हेही पहा- Chirag Paswan: पक्ष फुटला, चिन्हही गेले पण न डगमगता १०० टक्के स्ट्राईक रेटने निकाल खे…

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”