-
‘कान फिल्म फेस्टिव्हल’चे रेड कार्पेट आणि त्यावरील सेलेब्रिटीजची दिमाखदार फॅशन परेड हा दरवर्षी चर्चिला जाणारा विषय आहे. त्यात 'कान्स'मध्ये आजवर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिच्या लूकचा बोलबाला राहिला आहे. यंदाही ऐश्वर्या कोणत्या लूकमध्ये कान्सच्या रेड कार्पेटवर पाहायला मिळणार याची उत्सुकता सर्वांना आहे. येत्या १३ आणि १४ मे रोजी कान्सच्या रेड कार्पेटवर तारका उतरणार आहेत. गेल्या १४ वर्षांपासून ऐश्वर्या कान्स फेस्टीव्हलमध्ये आवर्जुन उपस्थित असते. तिच्या आजवरच्या प्रवासाच्या क्षणचित्रांचा हा संग्रह..
-
२००२ साली 'कान फेस्टीव्हल'मध्ये ऐश्वर्याने पदार्पण केले होते. फॅशन डिझायनर निता लुला हिच्या गोल्डन थिमवर आकर्षक साडी नेसलेल्या ऐश्वर्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
-
कान फेस्टीव्हल २००३ साली ऐश्वर्या पुन्हा एकदा फॅशन डिझायनर निता लुलाने डिझाईन केलेल्या ड्रेसमध्ये रेड कार्पेटवर उतरली होती.
-
२००४ सालच्या ऐश्वर्याच्या या लूकची चर्चा आजही केली जाते. ऐश्वर्याचा हा लूक वादग्रस्त ठरला होता.
-
२००५ सालच्या कान फेस्टीव्हलमधला ऐश्वर्याचा लूक.
-
२००६ साली ऐश्वर्याने परिधान केलेल्या या वेस्टर्न आऊट फिटला चांगली पसंती मिळाली होती.
-
२००७ साली ऐश्वर्या अभिनेता अभिषेक बच्चनसोबत विवाहबद्ध झाली. या वर्षी ऐश्वर्या पती अभिषेकसोबत पांढऱया रंगाच्या आऊटफिटमध्ये रेड कार्पेटवर उतरली होती.
-
कान फेस्टीव्हल २००८
-
‘कान फिल्म फेस्टिव्हल’ २००९
-
‘कान फिल्म फेस्टिव्हल’ २०१०
-
त्याच वर्षी म्हणजेच २०१० साली कान फेस्टीव्हलच्या दुसऱया दिवशी ऐश्वर्याने भरजरी साडी परिधान केली होती.
-
कान फिल्म फेस्टीव्हल २०११ आणि ऐश्वर्याचा लूक.
-
२०१२ सालचा कान फिल्म फेस्टीव्हल ऐश्वर्यासाठी वादग्रस्त ठरला. ऐश्वर्याचे गर्भधारणेच्या कालावधीत वजन वाढले होते. त्यामुळे तिच्या शरीरयष्टीतील बदल प्रकर्षाने जाणवला.
-
कान फिल्म फेस्टीव्हल २०१३ साल ऐश्वर्याने पुन्हा एकदा आपल्या मनमोहक लूकसह पुनरागमन केले.
-
केवळ रेड कार्पेटच नाही, तर २०१३ साली ऐश्वर्याने कान फेस्टीव्हलमध्ये इतर दिवशी परिधान केलेल्या वेस्टर्न आऊटला चांगली पसंती मिळाली होती.
-
कान फिल्म फेस्टीव्हल २०१३ आणि ऐश्वर्या.
-
कान फिल्म फेस्टीव्हल २०१४ आणि ऐश्वर्या.
-
कान फिल्म फेस्टीव्हल २०१४ आणि ऐश्वर्या.
-
कान फेस्टीव्हलच्या मागील पर्वात म्हणजेच २०१५ साली ऐश्वर्या या चार अनोख्या आणि आकर्षक आऊटफीटमध्ये दिसून आली.

Daily Horoscope: श्रावणाची सुरुवात ‘या’ तीन राशींना देणार भरघोस लाभ; कोण संकटमुक्त तर कोणाच्या कुंडलीत पडणार पैशांचा पाऊस? वाचा राशिभविष्य