-
अभिनेत्री कंगना रणौतचा हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रवास फारच रंजक आहे. अनेक चढउतार पाहात कंगनाने आपली स्वतंत्र ओळख बनवली आहे. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमामध्ये कंगनाने तिच्या आणि हृतिक रोशनमध्ये चाललेल्या वादाबद्दल काही खुलासे केल्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.
-
या कार्यक्रमासाठी राजधानी दिल्लीत अलेल्या कंगनाचा एक वेगळाच अंदाज यावेळी उपस्थितांना पाहण्याची संधी मिळाली. राष्ट्रीय पुरस्कारावर आपल्या नावाची छाप उमटवणाऱ्या कंगनाने यावेळी तिचे 'अॅब्स' दाखवत सर्वांनाच भुरळ पाडली.
-
या कार्यक्रमात कंगनाने पांढऱ्या रंगाच्या टॉपवर एक काळ्या रंगाचा कोट परिधान केला होता. 'माझ्या पाठीमागे माझ्याविषयी कोण काय बोलतं याविषयी मला फिकीर नाही, माझं आयुष्य फक्त माझंच आहे. मी नेहमीच पुढे काय होणार याबाबत विचार करते', असे ती या कार्यक्रमामध्ये म्हणाली.
-
कंगना लवकरच विशाल भारद्वाज यांच्या 'रंगून' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासह शाहिद कपूर आणि सैफ अली खान हे कलाकारही दिसणार आहेत.
कंगनाने तिच्या जीवनात सुरुवातीच्या काळात आपला शारिरीक छळ झाले असल्याचा खुलासाही केला. पण, या कार्यक्रमामध्ये कंगना धम्माल-मस्तीच्या मूडमध्ये दिसत होती. -
बी टाऊनच्या ‘क्वीन’ने आपण स्वत्वाचा लढा देणाऱ्यांपैकी नाही असेही ठाम मत मांडत त्यापेक्षा सदर प्रकरण बाजूला सारत आपली वाट चालत जाण्याला कंगनाने प्राधान्य दिले.
-
या कार्यक्रमात अनेकांचे डोळे विस्फारले जेव्हा कंगनाने तिचे 'अॅब्स' उपस्थितांना दाखवले. सुदृढ पुरुषांनाही लाजवतील असे या 'क्वीन'चे 'अॅब्स' पाहून अनेकजण घायाळ झाले.
-
कार्यक्रमादरम्यान कंगनाने तिच्या आणि हृतिक रोशनमध्ये उडालेल्या खटक्यांबद्दलही आपले मत मांडले. 'या दरम्यान माझ्यावर येणाऱ्या अनेक आव्हानांचा सामना करण्यासाठी मी समर्थ होते पण, हा लढा देताना माझ्यावर काही प्रमाणात दबाव होता' असं कंगनाने स्पष्ट केलं.

Donald Trump: “मला समजले की, भारताने…”; डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा, रशियाचा उल्लेख करत म्हणाले…