बॉलीवूडचा अकबर म्हणजेच हृतिक रोशन याच्या लूक्सवर लाखो मुली फिदा आहेत. या देखण्या कलाकाराचे नाव आजवर अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले. हृतिकच्या व्यावसायिक आयुष्यामुळे त्याच्या वैयक्तिक आयुष्यात ब-याच समस्या आल्या. कंगना आणि हृतिकमध्ये सध्या चालू असलेले वाद तर सर्वज्ञात आहेत. तर या बॉलीवूड 'हॅण्डसम हंक'च्या प्रेमात पडलेल्या अभिनेत्रींवर एक नजर टाकूया. हृतिक-करिना: त्यावेळी भावी पत्नी सुझानसोबत रिलेशनशीपमध्ये असताना हृतिक हा करिनाला डेट करत होता असे म्हटले जाते. पण, या दोघांमधील नाते काही टिकले नाही. -
हृतिक-बार्बरा मोरी: 'काइट' चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडल्याच्या तेव्हा चर्चा होत्या. त्यावेळी हृतिकने सुझानशी नुकतेच लग्न केले होते.
-
हृतिक-पूजा हेगडे: मोहंजोदारोतील सहकलाकार पूजा हेगडे हिच्यासोबत हृतिकचे प्रेमप्रकरण सुरु असल्याची या चित्रपटावेळी चर्चा होती. इतकेच नाही तर सुझान आणि हृतिकच्या घटस्फोटासाठी पूजा जबाबदार असल्याचे म्हटले जाते.
-
हृतिक-ऐश्वर्या: 'धूम २' मधील हृतिक आणि ऐश्वर्याची केमिस्ट्री कोणीच विसरू शकत नाही. या चित्रपटानंतर ते एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
-
हृतिक-कंगना: आजवरच्या हृतिकच्या रिलेशनशीपमधील कंगनासोबतचे नाते सर्वाधिक चर्चित राहिले. या नात्याचे आता दोघांसाठीही युद्धात परिवर्तन झाले आहे. हे दोघेही अप्रत्यक्षरित्या एकमेकांवर टीका करत असतात.
हृतिक-कतरिना: 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान या दोघांमध्ये प्रेमप्रकरण सुरु असल्याच्या चर्चा होत्या.

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग