-
बॉलीवूड आणि क्रीडा विश्व यांचे खूप जुने नाते आहे. बॉलीवूड कलाकार आणि क्रीडा खेळाडूंमध्ये आजवर अनेक जोड्या पाहावयास मिळाल्या. वर्षाभरापूर्वीच हरभजन सिंगने अभिनेत्री गीता बसराशी विवाह केला. त्यानंतर आता स्टार क्रिकेटपटू विराट कोहली हा अनुष्का शर्माला डेट करत आहेत. आता युवराज सिंग आणि हेजल कीच हीदेखील लवकरच विवाहबंधनात अडकण्यासाठी सज्ज झाले आहेत.
-
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटपटू युवराज सिंग आणि बॉलीवूड अभिनेत्री हेजल किच यांच्या लग्नाची तारीख आता जवळ येत आहे. येत्या ३० नोव्हेंबरला ही जोडी विवाहबंधनात अडकेल. चंदीगढ येथे पंजाबी विवाहपद्धतीनुसार या दोघांचा विवाह पार पडेल. त्यानंतर पुन्हा २ डिसेंबरला गोव्यात हिंदू विवाहपद्धतीनुसार त्यांचे लग्न होईल. अशाप्रकारे पंजाबी आणि हिंदू विवाहपद्धतीनुसार हे प्रेमीयुगुल लग्नबंधनात अडकेल.
-
या दोघांचे लग्न खूप मनोरंजक असणार आहे. याचा अंदाज त्यांच्या लग्नपत्रिकेवरूनच येतो. त्यांच्या लग्नाच्या पत्रिकेवर कार्टून आणि इलेस्ट्रेशनने डिझाइन करण्यात आली आहे. तसेच, त्यांच्या लग्नाला एक थीमही देण्यात आली आहे. क्रिकेटपटू आणि अभिनेत्रीमध्ये होणा-या या लग्नाची थीम ‘युवराज-हेजल प्रीमियर लीग’ अशी आहे.
-
युवराज आणि हेजलच्या लग्नाच्या तयारीची धुरा डिझायनर सॅन्डी आणि कपिल खुराणा यांनी सांभाळली आहे. या दोघांच्या लग्नाला अविस्मरणीय बनवण्यासाठी आम्ही काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सॅन्डी आणि कपिलने सांगितले.
-
या पत्रिकेसोबत असलेल्या चॉकलेट्सवर युवराज आणि हेजलच्या नावाची आद्याक्षरेही पाहायला मिळत आहेत.
-
युवराजचे लग्न दोन पद्धतींनी होणार असल्यामुळे पत्रिकासुद्धा दोन्ही कुटुंबांच्या अनुशंगाने छापण्यात आली आहे.
-
युवीची पत्रिका सध्या अनेकांच्याच मनात भरत आहे. सोशल मीडियावरही त्याची ही पत्रिका अनेकांच्याच पसंतीस उतरत आहे.
-
एक-दोन दिवस नव्हे तर जवळपास आठवडाभर युवी-हेजलच्या लग्नसोहळ्याची धम्माल असणार आहे. त्यामुळे या 'बिग फॅट पंजाबी वेडिंग'वरच अनेकांच्या नजरा खिळल्या आहेत.

Friendship Day 2025 : ‘फ्रेंडशिप डे’निमित्त दोस्तांना पाठवा खास मराठी शुभेच्छा, फ्री HD Images सह WhatsApp, Facebook, Instagram वर पोहोचवा मैत्रीतील गोडवा