-
'बाहुबली' या चित्रपटाने अभिनेता प्रभासला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आहे. मुख्य म्हणजे या चित्रपटाच्या पहिल्या भागातील प्रभासच्या लूकपेक्षा दुसऱ्या भागातील लूकने अनेकांना घायाळ केलं आहे.
-
गेल्या काही दिवसांमध्ये प्रभासच्या चाहत्यांचा आकडा झपाट्याने वाढला असून, त्यात फिमेल फॅन फोलोअर्सची संख्या जास्त आहे. विविध चित्रपटांमध्ये प्रभासला आजवर बऱ्याच लूक्समध्ये पाहिलं गेलं आहे. मुख्य म्हणजे त्याच्या बहुतांश लूक्सवर प्रेक्षकांनीही चांगलीच दाद दिली आहे.
-
प्रभासचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. मुख्य म्हणजे हे फोटो पाहताना त्याच्यात झालेला बदल आपल्यालाही जाणवतोय. 'ईश्वर' या चित्रपटातून प्रभासने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. या चित्रपटाच्या वाट्याला आलेल्या अपयशामुळे प्रभासची अभिनय क्षेत्रातील कारकिर्द धोक्यात दिसत होती. पण, त्याचे काका क्रिष्णम राजू यांनी त्याला पाठिंबा दिला.
-
'वर्षम' या चित्रपटाच्या रुपात प्रभास खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आला. 'वर्षम' या चित्रपटाचा हिंदीत रिमेकही करण्यात आला होता. 'बाघी' हा चित्रपट 'वर्षम'चा रिमेक आहे. या चित्रपटापासून प्रभासकडे रोमॅण्टिक अभिनेता म्हणूनही पाहिलं जाऊ लागलं. मुख्य म्हणजे त्याची आणि अभिनेत्री त्रिशा क्रिष्णनची ऑनस्क्रिन केमिस्ट्रीसुद्धा त्याला मिळालेल्या प्रसिद्धीमागचं कारण आहे.
-
त्यानंतर प्रभासने एकामागोमाग एक सुपरहीट चित्रपट देत स्वत:चं स्थान भक्कम केलं. त्याचे 'छत्रपती', 'चक्रम' आणि 'पूर्णमि' हे चित्रपट विशेष गाजले.
-
प्रभासच्या कारकिर्दीचा एकंदर प्रवास पाहिला तर, त्याच्या या प्रवासामध्ये बरेच चढउतार पाहायला मिळाले.
-
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये असणारा त्याचा वावर आणि त्याच्या नावाभोवती असणारं चाहत्यांचं वलय पाहता बॉलिवूड अभिनेत्यांना टक्कर देण्यासाठी हा अभिनेता सज्ज असल्याचं म्हणायला हरकत नाही.

Donald Trump : ‘तर पुन्हा १९२९ सारखी महामंदी येईल’; ट्रम्प यांचा टॅरिफच्या मुद्द्यावर अमेरिकन न्यायालयांना इशारा