-
सौंदर्याची खाण म्हणून ओळख असलेली विश्वसुंदरी आणि बॉलिवूड अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन. वय हा निव्वळ आकडा असतो हे ऐश्वर्याकडे पाहिल्यावर कळते. अशा या विश्वसुंदरीला बॉलिवूडमध्ये २० वर्षे पूर्ण झाली आहेत. वयाच्या २४ व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यापासूनच अॅशच्या सौंदर्यावर अनेजण घायाळ झाले होते.
-
मिस वर्ल्ड म्हणून नावाजलेली अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि तिच्या सौंदर्याची चर्चा नेहमीच सर्वत्र होत असते. ऐश्वर्या राय बच्चन हिंदीशिवाय विविध भाषांमधल्या चित्रपटांमध्येही काम केले आहे. एका चांगल्या अभिनेत्रीसोबतच ऐश्वर्या एक चांगली नृत्यांगनासुद्धा आहे.
-
तिने शास्त्रीय नृत्याचे रितसर प्रशिक्षणही घेतले आहे. पण, तुम्हाला माहितीये का, अभिनय क्षेत्रात ती जर का अपयशी ठरली असती तरी आज एक आर्किटेक्ट असती.
-
एका मुलाखतीत ऐश्वर्याने सांगितले होते की, 'मला आर्किटेक्ट बनायचे होते. चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. हा माझ्यासाठी एक दुसरा पर्याय होता. कुतुहल म्हणून मी अभिनयाकडे वळली होती.'
-
२० वर्षांच्या कारकिर्दीच ऐश्वर्याचं खासगी आयुष्यही चर्चेता विषय ठरलं होतं. विविध सहकलाकारांसोबतही अॅशचे नाव जोडले गेले होते. ज्यापैकी सलमान खानसोबतच्या तिच्या प्रेमप्रकरणाला बरीच हवा मिळाली होती.
-
'धूम २', 'जोधा अकबर', 'हम दिल दे चुके समन', 'ऐ दिल है मुश्किल', 'उमरावजान', 'देवदास' यांसारख्या विविध चित्रपटांतून ऐश्वर्याने चाहत्यांवर एक प्रकारची जादूच केली आहे.

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार लवकरच ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ? डिसेंबर २०२५ पर्यंत होऊ शकतात गडगंज श्रीमंत