-
अभिनेता सुबोध भावेच्या घरीही आज बाप्पाचं जोशात आगमन झालं. बाप्पाच्या सजावटीसाठी नवीन काय करावं असा प्रश्न अनेकांनाच पडतो पण सुबोधच्या घरी मात्र हे आधीच ठरलेलं असावं.
-
सुबोध आणि त्याच्या मुलांनी मिळून चक्क खेळाच्या मैदानातच त्याच्या बाप्पाला विराजमान केले आहे.
-
आपल्या या अनोख्या सजावटीबद्दल सांगताना सुबोध म्हणाला की, 'दरवर्षी आम्ही सगळे ठरवून सजावट करतो पण यंदा मला पुण्यात पोहोचायला उशीर झाला त्यामुळे माझा भाऊ सुमीत आणि त्याचा मुलगा मानसने ही संकल्पना करण्याचे ठरवले. मानसला क्रिकेट फार आवडतो तर माझी दोन्ही मुलं फुटबॉल खेळतात. त्यामुळे या दोन्ही खेळाच्या मैदानामध्ये आम्ही गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे.
-
सुबोधकडे दीड दिवसांचा गणपती असतो. या दीड दिवसांमुळे पुढे येणारे कित्येक दिवस आणि महिने आनंदाचे आणि उत्साहाचे जातात.
-
सुबोधने यावेळी बाप्पाकडे जातीवाद नष्ट व्हावा यासाठी साकडं घातलं आहे. धर्म आणि जात यापेक्षा मोठी माणुसकी आहे हे कळण्याची बुद्धी सर्वांना मिळो अशी प्रार्थना त्याने यावेळी केली.
-
सजावट करताना सुबोध भावे

गायक राहुल देशपांडेंचा घटस्फोट, १७ वर्षांच्या संसारानंतर पत्नीपासून विभक्त