-
मराठी चित्रपटसृष्टीत अनेक नवे विक्रम प्रस्थापित करणारा चित्रपट म्हणजे ‘सैराट’. नागराज मंजुळे दिग्दर्शित या चित्रपटातून ‘आर्ची’ आणि ‘परश्या’ची प्रेमकहाणी पाहायला मिळाली होती. याच सैराट प्रेमकथेचा आधार घेत ‘धर्मा प्रॉडक्शन्स’च्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन ‘धडक’चा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला.
-
‘धडक’
-
‘धडक’च्या फर्स्ट लूकमध्ये जान्हवी आणि ईशान एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याचे पाहायला मिळत आहे.
-
करण जोहरच्या निर्मिती संस्थेअंतर्गत साकारणाल्या जाणाऱ्या या चित्रपटाचे नावही अनेकांचे लक्ष वेधत आहे. चित्रपटाच्या पोस्टरवरही हे नाव ज्या पद्धतीने लिहिण्यात आले आहे ते पाहता, या चित्रपटाचा विषय ‘हॉनर किलिंग’शी संबंधित असल्याचे लक्षात येते. कारण, ‘धडक’ या नावावरही रक्ताचे शिंतोडे उडाल्याचे या पोस्टरमध्ये दाखवण्यात आले आहे.
-
प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी ही प्रेमकथा ६ जुलै २०१८ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचेही जाहीर करण्यात आले. त्यामुळे आता जान्हवी, ईशानचा ‘धडक’ बॉक्स ऑफिसवर किती यशस्वी ठरणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
-
ईशान आणि जान्हवी या दोघांसाठीही हा चित्रपट फारच महत्त्वाचा आहे यात शंका नाही. सेलिब्रिटी कुटुंबांतून आलेल्या या दोन्ही नवोदित कलाकारांवर एक वेगळ्यात प्रकारचे दडपण, असून आता त्यांच्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत.
-
जान्हवीची आई, म्हणजेच अभिनेत्री श्रीदेवीसुद्धा आपल्या मुलीच्या पदार्पणावर जास्तच लक्ष देत असल्याचे पाहायला मिळते.

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार लवकरच ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ? डिसेंबर २०२५ पर्यंत होऊ शकतात गडगंज श्रीमंत