-
अभिनेत्री सागरिका घाटगे आणि क्रिकेटर झहीर खानने गुरुवारी सकाळी नोंदणी पद्धतीने लग्न केले. झहीरच्या ‘प्रोस्पोर्ट फीटनेस स्टुडिओ’ची व्यवसाय प्रमुख अंजना शर्माने झहीर- सागरिकाच्या लग्नानंतरचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर या नवदाम्पत्याने संध्याकाळी कॉकटेल पार्टीचे आयोजन केले होते.
-
येत्या सोमवारी म्हणजेच २७ नोव्हेंबर रोजी मुंबईतील ताज महाल पॅलेस अॅण्ड टॉवर येथे त्यांच्या लग्नाचे रिसेप्शन पार पडणार आहे.
-
सागरिका, क्रिकेटर- अभिनेता अंगद बेदी याची फार जवळची मैत्रीण आहे. अंगदनेच सागरिकाची ओळख झहीरशी करुन दिली होती. दोघांची ओळख दीड वर्षांपूर्वी झाली होती.
-
युवराज-हेजलच्या विवाह सोहळ्यात झहीर आणि सागरिका एकत्र दिसून आले होते. त्यानंतर दोघांच्या नात्याबद्दल तर्कवितर्कांना उधाण आले.
-
मे महिन्यात झहीर- सागरिकाचा साखरपुडा झाला आणि त्यानंतर दोघांनी त्यांचे नाते सर्वांसमोर आणले.
-
सागरिका घाटगे आणि झहीर खानच्या लग्नाला अभिनेत्री विद्या मालवदे उपस्थित होते.
-
सागरिका घाटगे आणि झहीर खानच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल झाले.
-
सुरुवातीपासूनच या दोघांनी त्यांच्या लग्नाचे प्लॅन्स गुपित ठेवले होते. त्याचप्रमाणे त्यांनी साखरपुडाही गुपचुप केला होता.
-
झहीरचा सर्वात जवळचा मित्र आशिष नेहरासुद्धा या लग्नाला उपस्थित होता.
-
सागरिकाला शाहरुख खानच्या चक दे इंडिया चित्रपटाने प्रसिद्धी मिळाली होती.

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार लवकरच ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ? डिसेंबर २०२५ पर्यंत होऊ शकतात गडगंज श्रीमंत