-
'दृश्यम' या चित्रपटात अभिनेता अजय देवगणच्या मुलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री इशिता दत्ता मंगळवारी विवाहबंधनात अडकली. 'टार्झन' फेम वत्सल सेठसोबत तिने आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. इशिता ही अभिनेत्री तनुश्री दत्ताची बहीण असून वत्सलहून ती जवळपास १० वर्षांनी लहान आहे. एका मालिकेच्या सेटवर या दोघांची ओळख झाली. गेल्या काही महिन्यांपासून हे दोघे एकमेकांना डेट करत होते.
-
मुंबईतल्या जुहू येथील इस्कॉन मंदिरात हा लग्नसोहळा पार पडला. बॉलिवूड विश्वातील काही कलाकारांनीही या लग्नसोहळ्याला हजेरी लावली.
-
'रिश्तों का सौदागर बाजीगर' या मालिकेत वत्सल- इशिताने एकत्र काम केलं. तेव्हापासूनच ते एकमेकांना डेट करत होते. मात्र, कधीही दोघांनी उघडपणे रिलेशनशिपमध्ये असल्याचं स्पष्ट केलं नाही.
-
अजय देवगण पत्नी काजोलसह लग्नाला उपस्थित होता. विशेष म्हणजे वत्सल आणि इशिता या दोघांच्या बॉलिवूड पदार्पणातील चित्रपटात अजयने भूमिका साकारली होती. 'टार्झन: द वंडर कार' या चित्रपटात तो वत्सलच्या वडिलांच्या तर 'दृश्यम' या चित्रपटात तो इशिताच्या वडिलांच्या भूमिकेत दिसला. त्यामुळे दोन्ही कलाकारांशी जवळची ओळख असल्याने अजयने लग्नाला आवर्जून हजेरी लावली.
-
दोघांच्या करिअरविषयी बोलायचे झाल्यास इशिता आगामी 'फिरंगी' या चित्रपटात मुख्य भुमिकेत झळकणार आहे. यामध्ये ती कॉमेडियन कपिल शर्मासोबत भूमिका साकारणार आहे. तर वत्सल 'हासिल' या मालिकेत भूमिका साकारत आहे.

अखेर दाखवला होणाऱ्या पतीचा चेहरा! थाटात पार पडला प्राजक्ता गायकवाडचा साखरपुडा, जोडीदाराचं नाव आहे खूपच खास…