'कॉमेडी क्वीन' म्हणून नावारुपास आलेली भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकले. गोव्यात अतिशय दणक्यात त्यांचा विवाहसोहळा पार पडला असला, तरीही हा 'मॅरेज फिव्हर' काही केल्या उतरण्याचे नावच घेत नाहीये असेच म्हणावे लागेल. कारण सध्या सोशल मीडियालर सेलिब्रिटींच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन आणि त्यांच्या फॅन पेजवरुन भारती आणि हर्षच्या लग्नसोहळ्यातील काही खास क्षणांचे फोटो शेअर करण्यात येत आहेत. त्यामुळे भारतीच्या लग्नाची जादू कायम आहे असे म्हणायला हरकत नाही. -
सप्तपदीच्या वेळी भारती आणि हर्षने मॉडर्न टच असलेले पारंपरिक कपडे घातले होते.
-
सर्व विधी आणि चालीरितींनुसार पार पडलेल्या या विवाहसोहळ्याच्या शेवटी आयोजित करण्यात आलेल्या पार्टीत भारतीने लाल रंगाचा गाऊन घातला होता. तर हर्षही पांढऱ्या रंगाच्या सूटमध्ये रुबाबदार दिसत होता.
-
भारतीच्या लग्नसोहळ्यात आरजे मलिष्कानेही हजेरी लावली होती.
-
विनोदवीर राजीव ठाकूर, बलराज स्यालसुद्धा या 'कॉमेडी क्वीन'ला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले होते.
-
भारती- हर्षच्या लग्नसोहळ्याच्या निमित्ताने कॉकटेल पार्टी, मेहंदी आणि हळदी समारंभातही सर्वांचाच कल्ला पाहायला मिळाला.
-
अनिता हसनंदानी सुरुवातीपासूनच भारतीच्या लग्नसोहळ्यात सहभागी झाली होती.
-
आरजे मलिष्का, सनाया इराणी, मोहित सेहगल
-
टेलिव्हिजन विश्वातील 'मोस्ट हॅपनिंग कपल' म्हणून ओळखले जाणारे आशा नेगी, ऋत्विक धनजानी
-
टेलिव्हिजन विश्वातील काही प्रसिद्ध जोडपी.
-
भारतीसोबत विनोदी कार्यक्रमांमध्ये आपल्या अनोख्या शैलीत धमाल फटकेबाजी करणारा सुदेश लहिरीसुद्धा 'भारती की बारात'मध्ये सहभागी झाला होता.
-
किश्वर मर्चंट, करण वाही
-
जय भानुशाली, माही विज
-
आशा नेगी

बाई…कसली नाचली! ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर तरूणीने धरला ठेका; VIDEO पाहून कराल कौतुक