-
व्हॅलेंटाइन्स डेच्या आधी सर्वत्र प्रेमाचेच वारे वाहत असून, सध्या या प्रेमाला दाक्षिणात्य टच मिळाला आहे असं म्हणावं लागेल. प्रेम ही एक अशी भावना आहे, जेथे भाषा, प्रांत या सर्व गोष्टी अगदी नगण्य होतात. अचानक प्रेमाची व्याख्या पुन्हा नव्याने आठवण्याचे कारण ठरतेय, अभिनेत्री प्रिया प्रकाश वरियर. सोशल मीडियावर हे नाव सध्याच्या घडीला अनेकांच्या सर्चलिस्टमध्ये अग्रस्थानी असून, तिच्या फोटोंचा संग्रहच जणू फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर पाहायला मिळतोय. अवघ्या काही क्षणांमध्ये लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचणारी प्रिया आगामी ‘उरू अदार लव्ह’ या चित्रपटातील ‘मनिक्य मलरया पूवी’ (Manikya Malaraya Poovi) या गाण्यामुळे अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकवून गेली आहे. आपल्या डोळ्यांनी बरेच काही बोलणाऱ्या या अभिनेत्रीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नजर टाकली असता तिच्या बोलक्या डोळ्यांचे रहस्य उलगडते.
-
‘उरू अदार लव्ह’ चित्रपटाने मल्याळम चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी प्रिया ही मुळची केरळची आहे. या फोटोतील प्रियाच्या डोळ्यांनी अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकवला असेल यात शंका नाही.
-
आतापर्यंत युट्यूबवर प्रियाच्या गाण्याला ५,२०४,८३१ इतके व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी ते शेअरही केले आहे.
-
केरळमधील पारंपरिक नृत्यप्रकार असलेल्या मोहिनीयट्टम नृत्याचे प्रियाने प्रशिक्षण घेतले आहे.
-
प्रिया प्रकाश वरियरने फोटोशूट केले असून तिने काहीवेळा रॅम्पवॉकही केला आहे.
-
आपल्यावर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या सर्व चाहत्यांचे प्रियाने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून आभार मानले आहेत.

ADR Report: केंद्र आणि राज्यांच्या सर्व मंत्र्यांकडे मिळून एकूण २३,९२९ कोटींची मालमत्ता; तर महाराष्ट्रातल्या मंत्र्यांकडे…