-
बॉलिवूड निर्माता, दिग्दर्शक करण जोहर नेहमीच विविध कारणांनी या कलाविश्वाला एकत्र आणत असतो. यावेळीसुद्धा त्याने पुन्हा बी- टाऊन सेलिब्रिटींना एकत्र आणलं. त्यामागचं कारण होतं, करणच्या आईचा ७५ वा वाढदिवस. १८ मार्चला करणच्या आईच्या ७५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने खास पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सिनेसृष्टीतील त्याच्या मित्रमंडळींची उपस्थिती पाहायला मिळाली. ज्यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, करिना कपूर खान, काजोल, राणी मुखर्जी यांनी हजेरी लावली होती.
-
पाहुण्यांच्या या गर्दीत करणच्या जुळ्या मुलांवरही अनेकांच्या नजरा खिळल्या होत्या.
-
सोशल मीडियावर हिरू जोहर यांच्या बर्थडे पार्टीचे फोटो व्हायरल झाले आहेत.
-
या पार्टीमध्ये राणी मुखर्जी, करण जोहर आणि मनिष मल्होत्रा यांचं त्रिकूट पुन्हा एकत्र आल्याचं पाहायला मिळालं.
-
यावेळी करणच्या आईसोबत सेल्फी काढण्याचा मोह अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रालाही आवरला नाही.
-
यावेळी गायक सोनू निगमने त्याच्या सुरेल आवाजात करणच्या आईसाठी 'लग जा गले', 'अजीब दास्ताँ है ये…' या गाण्यांचा नजराणा सादर केला.
-
करणने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन त्याच्या कुटुंबाचा सुरेख फोटो पोस्ट केला होता.

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार लवकरच ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ? डिसेंबर २०२५ पर्यंत होऊ शकतात गडगंज श्रीमंत